विशेष प्रतिनिधी
मुंबई : सरकार विरोधात आवाज उठवणाऱ्या विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम सरकार करत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. याबाबत आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहिणार असून लवकरच त्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.The task of suppressing the voice of the opposition, Ramdas Athavale will demand the imposition of presidential rule in Maharashtra
आठवले म्हणाले की, मी अमित शाहांना एक पत्र लिहिणार आहे. त्यांना भेटणारही आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणार आहे. विरोधकांना सातत्याने त्रास दिला जाणार असेल तर हे सरकार बरखास्त केलं पाहिजे. सरकार बरखास्त करण्याची वेळ नक्की येईल. त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू व्हावी.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई पोलिसांनी नोंदवलेला जबाब, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरोधात दाखल झालेला गुन्हा आणि माजी उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधण्यासाठी सुरू झालेली चौकशी या गोष्टीतून सरकार सत्तेचा गैरवापर करत आहे,असा आरोप भाजपकडून केला जात आहे.
The task of suppressing the voice of the opposition, Ramdas Athavale will demand the imposition of presidential rule in Maharashtra
महत्त्वाच्या बातम्या
- Congress Debacle : काँग्रेस कार्यकारिणी गांधी परिवाराची “पाठ राखी”; पण सोनियांनी उगारली 5 प्रदेशाध्यक्षांवर काठी!!
- प्रविण दरेकर यांच्यावरील कारवाई सुडबुद्धीने नाही ; महेश तपासे यांचा दावा
- रखडलेल्या प्रकल्पांच्या यादीत पुण्यातील ४,८०० सदनिका
- हिजाबशिवाय महाविद्यालयात जाणार नाही उडुपी येथील मुस्लिम मुलींचा निर्धार