विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : नुकताच मुंबई पोलिसांनी एका महिला ड्रग्ज पेडलरला अटक केली होती. तिची कसून चौकशी केल्यानंतर पोलिसांना ढोलगरवाडी संबंधी माहिती कळाली. सापांच्या विषाचा उपयोग काही अमली पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. ढोलगरवाडी हे कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील एक ठिकाण आहे. हे ठिकाण सापांसाठी प्रसिध्द आहे. बऱ्याच विषारी सापांच्या जाती येथे आढळून येतात. तसेच दरवर्षी नागपंचमीच्या दिवशी येथे मोठी यात्रा देखील भरते. या ठिकाणी एक सर्पोद्यान देखील आहे.
The strings of a woman drug peddler arrested in Mumbai go straight to Kolhapur?
पोलिसांनी अतिशय गुप्त पद्धतीने ढोलगरवाडी येथील एका फार्महाऊसवर छापा टाकला. कोणत्याही लोकल पोलीसना त्यांनी या सर्चमध्ये सामील करून घेतले नाही. त्यामुळे अतिशय गुप्त पद्धतीने चाललेल्या या तपासामध्ये पोलिसांना सापाच्या विषाचा उपयोग ड्रग बनवण्यासाठी होतो की नाही याची पडताळणी करावयाचे आहे.
संबंधित फार्महाऊस हे एका वकीलांचे आहे. हे वकील एका शिक्षण संस्थेशी निगडित कामे करतात अशी माहिती तपासामध्ये आढळून आली आहे. या फार्मसवरील कर्मचाऱ्यांकडे चौकशी करता पाेलिसांनी परिसराची कसून तपासणी केलेली आहे. मुंबई क्राइम ब्रान्च तर्फे हा तपास करण्यात आला आहे.
The strings of a woman drug peddler arrested in Mumbai go straight to Kolhapur?
महत्त्वाच्या बातम्या
- पवार निघाले ममतांच्या पाठोपाठ; दिल्लीत जाऊन काँग्रेस फोडली!!; जी – 23 मधला नेता लावला राष्ट्रवादीच्या गळाला!!
- पूर्वांचल एक्स्प्रेसवर दिसली देशाची एअर पॉवर, पंतप्रधान मोदींची हर्क्युलस विमानातून एक्स्प्रेसवर एंट्री
- काश्मीरमध्ये सुरक्षा दलाने दोन व्यापारी आणि दोन दहशतवाद्यांना टिपले
- दहशतवादाचा चिथावणीखोर झाकिर नाईकच्या इस्लामिक रिसर्च’वरील बंदी पुन्हा वाढविली