प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आजारपणाच्या मुद्द्यावरून आणि विधीमंडळ अधिवेशनाला उपस्थित राहण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद आता त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्या पर्यंत येऊन ठेपला आहे आणि त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या पर्यंतही नेऊन ठेवण्यात आला आहे. The rest have drawn Rashmi Vahini and Amrita Vahini into Maharashtra politics
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत बरी नसेल तर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा चार्ज आदित्य ठाकरे यांच्याकडे द्यावा, अशी सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी केली होती. परंतु या सूचनेवर महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले होते. त्यावर आज चंद्रकांत दादा पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचा मुलावर आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेत्यांवर विश्वास नसेल, तर रश्मी वहिनींना मुख्यमंत्रिपदाचा चार्ज द्यावा. त्यांना मंत्री करून मंत्रिमंडळात सामील करून घ्यावे अशी सूचना केली आहे.
चंद्रकांत दादांच्या सूचनेवरून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर भडकल्या आहेत. मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नाही. परंतु, त्यांच्यावरून अनावश्यक वाद निर्माण करून चंद्रकांत दादा पाटील यांसारखे मोठे नेते आपले मन किती छोटे आहेत हे दाखवत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी वहिनी यांचे नाव राजकारणाशी जोडायचे काहीच कारण नाही. देवेंद्र फडणवीस हे काय अमृता फडणवीस यांच्याकडे चार्ज देऊन त्यांना विरोधी पक्षनेते करणार आहेत का?, असा प्रतिसवाल किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.
स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तब्येतीबद्दल किंवा विधिमंडळात उपस्थित राहण्याबद्दल चकार शब्दही बोललेले नाहीत. देवेंद्र फडणवीस देखील या विषयावर फारसे बोलले नाहीत. पण हे दोन नेते सोडून चंद्रकांत दादा पाटील आणि किशोरी पेडणेकर यांच्यासारखे बाकीचेच नेते एकमेकांवर तोंडसुख घेताना रश्मी ठाकरे आणि अमृता फडणवीस यांच्या नावांचे उल्लेख करून त्या दोघींनाही महाराष्ट्राच्या राजकारणात खेचून आणत आहेत.
The rest have drawn Rashmi Vahini and Amrita Vahini into Maharashtra politics
महत्त्वाच्या बातम्या
- बीज बँक प्रत्येक गावागावात साकारा; बीज माता राहीबाई पोपरे यांचे आवाहन
- एसटी स्टॅण्डवर गाणं गाऊन हकायच्या कुटुंबाचा गाडा ; महेश टिळेकर यांनी पैठणी आणि आर्थिक मदत देऊन केला सन्मान
- हिंदू देवदेवतांविषयी केलेल्या विधानाबाबत जितनराम मांझी यांनी मागितली माफी
- तृणमूल कॉँग्रेसचे नेते डेरेक ओ ब्रायन निलंबित, सभापतींच्या दिशेने भिकावले नियमांचे पुस्तक
- उध्दव ठाकरे यांचे खास रवींद्र वायकर यांची ईडीकडून आठ तास चौकशी