विशेष प्रतिनिधी
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेले दिलखुलास स्वागत पाहिले आणि त्यांचे स्वागत करणारे मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री यांचे सरकार अवघ्या 72 तासांत “पडणार” असल्याची “खात्रीच” पटली!! The Prime Minister was warmly welcomed in Mumbai by the Chief Minister – Deputy Chief Minister
16 शिवसेना आमदारांच्या निलंबनाबाबत विशिष्ट मूदतीत निर्णय घ्या, असे सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आदेश दिल्यावर प्रचंड उत्साहात आलेल्या संजय राऊत यांनी शिंदे – फडणवीसांच्या सरकारची मुदत फक्त 72 तास एवढी “अल्टर” करून टाकल्यावर, तर हे सरकार “जाणार” याची “खात्री” झालीच होती!!
पण राऊतांनी “अल्टर” केलेली मुदत संपून 36 तास उलटल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या बैठकीसाठी मुंबईत आले, त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे प्रचंड टेन्शनखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत करतील, असे चित्र अपेक्षित होते.
… पण पंतप्रधानांच्या स्वागताचा फोटो पाहिले आणि संजय राऊत यांनी केलेल्या भाकिताची “खात्रीच” पटली…, की “जाणार”… हे सरकार “जाणार”!!, असे वाटले. कारण एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी ज्या दिलखुलासपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले, त्या फोटोंमध्ये सर्व नेते एकदम रिलॅक्स मूडमध्ये दिसले. मोदींनी सर्व नेत्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य दिसले…!!, हे काय सरकार 72 तासांत जाणार असल्याचे लक्षण आहे का??, असाच ठळक सवाल उपस्थित झाला आणि नेहमीप्रमाणेच संजय राऊतांचे भाकित फोल ठरले!!
The Prime Minister was warmly welcomed in Mumbai by the Chief Minister – Deputy Chief Minister
महत्वाच्या बातम्या
- सुप्रिया सुळे यांची वैयक्तिक डायरी की महाराष्ट्राच्या आत्मपॅम्फ्लेटची तयारी??
- नितीश कुमारांना मोठा धक्का, ‘JDU’प्रदेश उपाध्यक्ष लालन पासवान यांचा राजीनामा
- हमासशी आरपारच्या मूडमध्ये अमेरिका! मोठ्याप्रमाणावर शस्त्रसाठा पाठवल्यानंतर आता परराष्ट्रमंत्री इस्रायलला पोहोचले
- पेटीएम पेमेंट्स बँकेला रिझर्व्ह बँकेने दिला दणका, 5.39 कोटींचा दंड; जाणून घ्या कारण