विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या निकाल वाचनात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अत्यंत धक्कादायक निर्णय दिला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असतानाची 1999 ची पक्ष घटना त्यांनी वैध ठरवत ती मान्य करून त्यानुसार निकाल दिला. त्याचवेळी त्यांनी 2018 ची पक्ष घटना अमान्य केली. त्यामुळे उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा राजकीय धक्का बसला आहे. The party constitution of 1999, when the Shiv Sena chief was still alive, was accepted
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सुरूवातीला जी निरीक्षणे वाचली, त्या निरीक्षणामध्ये नार्वेकर यांनी 2018 ची घटना अमान्य असल्याचे नमूद केले. अपात्रतेचा निकाल देताना निवडणूक आयोगाकडे असलेल्या घटनेचा आधार घेत असल्याचेही त्यांनी सांगितले.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असतानाची 1999 ची पक्ष घटना का मान्य केली आणि 2018 ची पक्ष घटना का अमान्य केली??, याची कारणेही राहुल नार्वेकर यांनी विशद केली.
राहुल नार्वेकर म्हणाले :
दोन्ही गटांनी वेगवेगळ्या पक्ष घटना दिल्या. उद्धव ठाकरे गटाने दिलेल्या पक्ष घटनेवर तारीख नाही. निवडणूक आयोगाने एक पक्ष घटना दिली, पण त्यावरही तारीख नाही. 2018 ला घटनेत जी दुरुस्त केली ती चूक होती. 2018 मध्ये पक्षाच्या घटनेत केलेला बदल हा निवडणूक आयोगाला कळवला नव्हता. प्रथमदर्शनी निवडणूक आयोगाकडे असलेल्या 1999 सालच्या शिवसेनेच्या घटनेचा आधार घ्यावा लागेल. 2018 सालची दुरुस्ती ही मान्य करता येणार नाही. घटनेच्या 10 व्या सुचीनुसार शिवसेना कुणाची?, अधिकृत व्हीप कुणाचा?, बुहमत कुणाचे हे ठरवायचे होते, ते ठरवून निकाल दिला आहे.
34 याचिका या ६ गटात विभागल्या आहेत. याचिका क्रमांक १८ ही तिसऱ्या गटात आहे. चौथ्या गटात याचिका क्रमांक १९चा समावेश आहे. व्हीपचे उल्लंघन केल्याचा त्यात आरोप आहे. पाचव्या गटात बहुमत प्रस्तावात विरोधी मतदान केल्याचे आरोप आहेत. सर्वोच्च न्यायालयाचा आदर ठेवून मी निकाल देत आहे. प्रत्येक गटातील ठळक मुद्दे मी वाचून दाखवणार आहे. पहिल्या गटातील निरिक्षण मी वाचुन दाखवतो. सुभाष देसाई विरुद्ध महाराष्ट्र सरकार अध्यक्षांकडून संपूर्ण निकाल पत्र न वाचता निरीक्षण वाचली गेली.
दरम्यान, घटना, पक्षीय रचना आणि विधीमंडळ पक्ष यावर हा निकाल आधारित असेल. 2018 साली पक्षाच्या घटनेत केलेले बदल याबाबत दोन्ही गटांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाकडे असलेल्या घटनेचा आधार घेत आपण निकाल दिल्याचे नार्वेकरांनी स्पष्ट केले.
The party constitution of 1999, when the Shiv Sena chief was still alive, was accepted
महत्वाच्या बातम्या
- मालदीवचे टुरिझम मार्केट आता तुम्हीच सुधारा; चीन धार्जिण्या अध्यक्षांनी टाकली चीनवरच जबाबदारी!!
- शाजापूरमध्ये अक्षत कलश यात्रेवर हल्लेखोरांची दगडफेक, परिसरात कलम 144 लागू
- खर्गे, ममता, पवारांची वक्तव्ये Off track; सौदी अरब अध्यक्षांसह मोदी On the Ram track!!
- भयानक : चार वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह बॅगेत घेऊन जाणाऱ्या स्टार्ट अपच्या CEOला बंगळुरुमध्ये अटक