विशेष प्रतिनिधी
नागपूर : नागपूरच्या कळमना परिसरात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून निर्माणाधीन असलेल्या उड्डाणपुलाचा एक भाग खाली कोसळला आहे. दुर्घटना घडली तेव्हा उड्डाणपुलाचा निर्माण कार्य बंद होतं. सोबतच रस्त्यावर जास्त वाहतूकही नव्हती.The part Of the bridge under construction collapsed in Nagpur
त्यामुळे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही दुर्घटना घडली. नागपूरच्या पारडी परिसरातील एच बी टाऊन चौका वरून कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीकडे जाणाऱ्या रस्त्यावर गेल्या अनेक वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे.
त्याच उड्डाणपुलाच्या दोन पिलर दरम्यान सुमारे ५९ ते ६० फूट लांबीचा एक सेगमेंट मधून तुटल्यामुळे खाली कोसळला. जेव्हा ही दुर्घटना घडली त्या वेळेस खालून वाहतूक नव्हती, सोबतच निर्माण कार्य सुरू नव्हतं, त्यामुळे दुर्घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नाही. मात्र, दोषी लोकांवर कारवाईची मागणी करण्यात आली.
- नागपूरच्या कळमना भागात पूल उभारला जात आहे
- उड्डाणपुलाचा एक भाग खाली कोसळला
- ५९ ते ६० फूट लांबीचा एक सेगमेंट मधून तुटला
- रस्त्यावर वाहतूक नसल्याने जीवितहानी नाही