विशेष प्रतिनिधी
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांना स्थान दिले नाही म्हणून स्वतः छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर नाराजी व्यक्त केलीच, त्याचबरोबर महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी देखील भुजबळांच्या नाराजीला हवा दिली, पण त्याच वेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून मंत्रिमंडळातल्या रिकाम्या जागेवर जयंत पाटलांची वर्णी लागेल, अशी बातमीची पुडी सोडण्यात आली.
छगन भुजबळ यांचा मंत्रिमंडळात समावेश केला नाही म्हणून समस्त ओबीसी वर्ग नाराज असल्याचे वातावरणात निर्माण करण्याचा भुजबळ आणि त्यांच्या साक्षीदारांचा प्रयत्न राहिला. बुलढाण्यात भुजबळांच्या समर्थनासाठी मोर्चा निघाला. छगन भुजबळांच्या नाराजीला काँग्रेसचे नेते नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार यांनी हवा दिली. मी मनोज जरांगे यांच्याशी पंगा घेतला, त्याची बक्षिसी मिळाली असे छगन भुजबळ यांनी पत्रकारांना सांगितले. त्यावर जो ओबीसी की करेगा बात भाजप उसको हटायेगी याचा अनुभव मी स्वतः घेतला असे नाना पटोले यांनी भुजबळांचे समर्थन करताना सांगितले. विजय वडेट्टीवार यांनी नानांच्या वक्तव्याला दुजोरा दिला.
या पार्श्वभूमीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून वेगळीच बातमीची पुडी आमदार अमोल मिटकरी यांनी सोडली मंत्रिमंडळात एक जागा रिकामी आहे, त्या जागेवर लवकरच जयंत पाटील येऊन बसतील, असे अमोल मिटकरी यांनी जयंत पाटलांच्या जुना वक्तव्याचा हवाला देऊन सांगितले. योग्य वेळी योग्य निर्णय असे जयंत पाटील म्हणाल्याची आठवण अमोल मिटकरी यांनी करून दिली. त्याचबरोबर छगन भुजबळ लवकरच राज्यसभेवर जातील अशी बातमी देखील राष्ट्रवादीतून पुढे करण्यात आली.
पण या सगळ्या बातम्यांमधून शरद पवारांनी निर्माण केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस नावाच्या प्रवृत्तीची सत्तेची हाव किती मोठी आहे आणि केवळ एखादे मंत्रीपद दिले नाही म्हणून लगेच तिथे बंडखोरीची अन्याय झाल्याची भाषा कशी सुरू होते, हेच उघड्यावर आले.
The opposition gave vent to Chhagan Bhujbal displeasure.
महत्वाच्या बातम्या
- Mani Shankar Aiyar मणिशंकर अय्यर म्हणाले- गांधी परिवाराने माझे करिअर उद्ध्वस्त केले, सोनिया-राहुल 10 वर्षांत एकदा भेटले
- Omar Abdullah: ओमर अब्दुल्लांनी काँग्रेसचे उपटले कान, म्हणाले- EVMवर रडणे थांबवा, विश्वास नसेल तर निवडणूक लढवू नका!
- Ustad Zakir Hussainतबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे वयाच्या 73व्या वर्षी निधन; 2023 मध्ये पद्मविभूषणने सन्मान
- Danish Merchant : मुंबई पोलिसांनी दाऊदचा साथीदार डॅनिश मर्चटला अटक