द्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते झाला पोर्टलचा शुभारंभ
विशेष प्रतिनिधी
पुणे : केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या अखत्यारितील केंद्रीय नोंदणी विभागाच्या ‘सहकार से समृद्धी’ या डिजिटल पोर्टलचा शुभारंभ आज केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. चिंचवड येथे आयोजित कार्यक्रमास केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचेसह सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. The new portal Sahakar Se Samridhi will be a milestone for the development of cooperative sector Eknath Shinde
याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, ‘’महाराष्ट्राच्या आणि सहकाराच्यादृष्टीने महत्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे. केंद्राच्या सहकार विभागाने अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. केंद्र सरकार सहकार क्षेत्राच्या विकासाकडे अत्यंत सकारात्मकतेने लक्ष देत आहे. सहकार विभागात नवे चैतन्य दिसून येत आहे. ‘सहकार से समृद्धी’ हे नवे पोर्टल सहकार क्षेत्राच्या विकासासाठी मैलाचा दगड ठरेल.’’ तसेच या पोर्टलमुळे नोंदणीची स्थिती, नोंदणी, आदेश, सोसायटीचे प्रमाणपत्र, विवरण सामान्य शेतकऱ्यांना उपलब्ध होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
याशिवाय, महाराष्ट्राच्या विकासात सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. विशेषत: पश्चिम महाराष्ट्राच्या विकासात सहकार क्षेत्राचे योगदान मोठे आहे. राज्यात २ लाख २० हजार सहकारी संस्था असून ६०० पेक्षा अधिक बहुराज्य संस्था आणि सोसायट्या कार्यरत आहेत. सहकारी संस्थांमध्ये ५ कोटी २८ लाख सदस्य आहेत. सहकारी बँकेचे डिपॉझिट २ लाख ३१ हजार कोटींपेक्षा जास्त आणि वर्किंग कॅपिटल साडेचार लाख कोटींपेक्षा जास्त आहेत. प्रायमरी ॲग्रीकल्चर सोसायटी पॅक्स या सहकार चळवळींचा मोठा आधार आहेत. देशातील सर्वाधिक २१ हजार पॅक्स महाराष्ट्रात आहेत ही अभिमानास्पद बाब आहे असे सांगून या संस्थांना बळकटी देण्याचे कार्य केंद्राच्या सहकार मंत्रालयाने केले आहे. असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
The new portal Sahakar Se Samridhi will be a milestone for the development of cooperative sector Eknath Shinde
महत्वाच्या बातम्या
- ‘चांद्रयान-3’ बद्दल GOOD NEWS! चंद्राच्या कक्षेत पोहोचले, ‘इस्रो’ने दिली माहिती
- नेमाडेंची मुक्ताफळे; औरंगजेबाच्या दोन राण्या काशीच्या पंड्यांनी केल्या भ्रष्ट; शिवाजी महाराजांचा मुख्य सरदार मुसलमान, तर औरंगजेबाचा हिंदू!!
- Earthquake: दिल्ली-एनसीआर मध्ये ५.८ रिश्टर स्केलचा भूकंप, लोक घाबरून पळाले घराबाहेर
- तामिळनाडू : मंत्री व्ही.सेंथील बालाजी यांच्या निकटवर्तीयाच्या घरावर ‘ED’चा छापा!