Saturday, 10 May 2025
  • Download App
    धडा शिकवण्यासाठी पाकिस्तानवर आणखी एक सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज , रामदास आठवले यांचे मत|The need for another surgical strike on Pakistan to teach a lesson, says Ramdas Athavale

    धडा शिकवण्यासाठी पाकिस्तानवर आणखी एक सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज , रामदास आठवले यांचे मत

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : पाकिस्तान जम्मू काश्मीरमध्ये अतिरेकी कारवाया करतं आहे. त्यांना धडा शिकवण्यासाठी पाकिस्तानवर आणखी एक सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज आहे असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.The need for another surgical strike on Pakistan to teach a lesson, says Ramdas Athavale

    आठवले म्हणाले, पाकिस्तान आपल्या कुरापती काढतो आहेत. या कारवाया थांबवायच्या असतील तर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईकल करावा लागेल असं अमित शाह म्हणाले होते. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे. पाकिस्तानवर आता पुन्हा सर्जिकल करण्याची गरज आहे’ल. पाकिस्तानने भारताशी मैत्री करून विकास साधला पाहिजे असंही रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.



    रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्याचा विषय आता संपलेला आहे. अनेकदा प्रयत्न करूनही कोणी एकत्र येत नाही त्यामुळे हा विषय संपला आहे, असेही आठवले यांनी सांगितले. दलित पँथरला 50 वर्षे होणार आहेत. त्यानिमित्ताने दलित पँथरचे पुनरूज्जीवन करणार आहे, असेही ते म्हणाले. सर्जिकल स्ट्राईक करण्याची गरज आहे. उत्तर प्रदेशात ब्राह्मण संमेलन आयोजित करणार असून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना निमंत्रण देणार असल्याचंही सांगितलं आहे.

    जम्मू काश्मीरमध्ये हत्या केल्या जात आहेत. एलओसीवर दहशतवाद्यांची घुसखोरी होते आहे. सीमेवर होणारे हे प्रकार आम्ही कदापि खपवून घेणार नाही. पाकिस्तानने आपल्या कारवाया थांबवल्या नाहीत तर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला उत्तर देऊ शकतो असं अमित शाह यांनी म्हटले होते.

    The need for another surgical strike on Pakistan to teach a lesson, says Ramdas Athavale

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा