• Download App
    The name Sharad Pawar, is it profitable or the political loss...?? लोहा नगरपरिषद निवडणुकीत शरद पवार नावाचा फायदा की तोटा??; कुणाला बसणार फटका??

    लोहा नगरपरिषद निवडणुकीत शरद पवार नावाचा फायदा की तोटा??; कुणाला बसणार फटका??

    Sharad Pawar

     

     

    नाशिक : लोहा नगरपरिषद निवडणुकीत शरद पवार नावाचा फायदा की तोटा??; कुणाला बसणार फटका??, असे विचारायची वेळ तिथल्या राजकीय घडामोडींनी आणली.The name Sharad Pawar, is it profitable or the political loss…??

    नांदेड जिल्ह्यात भाजपने ताकद वाढविण्यासाठी अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर यांची मोट बांधायचा प्रयत्न केला पण प्रताप पाटील चिखलीकर यांना अशोक चव्हाण यांचा राजकीय सहवास मानवला नाही. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली. चिखलीकरांच्या पाठोपाठ त्यांच्या समर्थकांनी सुद्धा अशीच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक केली. यातच लोहा नगर परिषदेत बाहुबली नेते मानले गेलेले शरद नामदेव पवार यांचाही समावेश राहिला. दोनच वर्षांपूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, पण भाजपचे त्यांच्याशी आणि त्यांचे भाजपशी काही नाते जुळले नाही. भाजपने त्यांना तालुका अध्यक्षपद दिले होते, पण तेवढ्यावर त्यांचे समाधान झाले नाही. लोहा नगरपरिषदेच्या अध्यक्षपदाची उमेदवारी मिळेल. या आशेवर शरद नामदेव पवार राहिले, पण भाजपने त्यांना “कात्रजचा घाट” दाखविला. त्यामुळे शरद नामदेव पवार यांनी प्रताप पाटील चिखलीकरांसारखीच अजितदादांच्या राष्ट्रवादीची कास धरली.



    अजित पवारांच्या राष्ट्रवादीला तिथे उमेदवार नव्हता म्हणून त्यांनी लगेच शरद नामदेव पवारांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देऊन टाकली. पण त्यामुळेच भाजपच्या नेत्यांना शरद पवार या नावावर त्यांना ठोकून काढायची संधी मिळाली.

    – अशोक चव्हाणांची बॅटिंग

    लोहा नगरपरिषदेच्या निवडणुकीत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा झाली. त्या सभेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जोरदार बॅटिंग केली. आपल्या उमेदवाराचे नाव गजानन सूर्यवंशी आहे आणि समोर शरद पवार आहे. शरद पवार आणि विश्वासार्हता यांचा परस्पर काही संबंध आहे का?? काल इथे तर आज तिकडे असला त्यांचा प्रकार आहे, असा टोमणा अशोक चव्हाण यांनी शरद नामदेव पवार यांना हाणला. शरद पवारांची नसलेली राजकीय विश्वासार्हता अशोक चव्हाणांनी शरद नामदेव पवार यांना चिकटवून टाकली. ज्येष्ठ नेते शरद पवारांनी कायमच तळ्यात मळ्यात भूमिका घेतली. ते कधीच एका राजकीय भूमिकेवर ठामपणे चिकटून राहिले नाहीत. उलट आपल्याच नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसून आपल्या सहकार्यांचा विश्वासघात करण्याचे राजकारण त्यांनी कायम केले. नेमक्या याच मुद्द्यावर प्रहार करून अशोक चव्हाण यांनी शरद पवारांचे नाव घेत शरद नामदेव पवार यांना ठोकून काढले.

    The name Sharad Pawar, is it profitable or the political loss…??

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chandrashekhar Bawankule : शेतकऱ्यांच्या कर्ज वसुलीला स्थगिती; सरकार शेतकऱ्यांच्या बाजूने – चंद्रशेखर बावनकुळे

    “जिथे” भाजपला कुणी नव्हते विचारत; “तिथे” पक्षाला आणि NDA ला उमेदवार मिळाले 21 हजार 65!!

    नगरपालिका निवडणूक शिगेला पोहोचली, पण तरी शरद पवारांनी अजून विरोधकांना “हा” सवाल का नाही विचारला??