वृत्तसंस्था
मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन मुंबई येथे होणारे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन केवळ दोन दिवस होणार आहे. ५ आणि ६ जुलै रोजी ते पार पडेल. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत याबाबत चर्चा करण्यात आली. The monsoon session of the state legislature will be held for two days on July 5 and 6
लसीचे दोन्ही डोस घेतलेले असले तरी अधिवेशन कालावधीत विधानभवन परिसर प्रवेश करण्यासाठी सर्वांना RT-PCR कोरोना चाचणी सक्तीची केली आहे. यासाठी विधानभवन, मुंबई येथे शनिवार व रविवारी ३ व ४ जुलै रोजी RT-PCR चाचणीची व्यवस्था करण्यात येणार आहे.
गर्दी होऊ नये यासाठी विधानमंडळाच्या सदस्यांचे स्वीय सहायक, वाहनचालक व सुरक्षा रक्षक यांची बसण्याची व्यवस्था बाहेरील तंबूमध्ये आहे. मंत्री व राज्यमंत्री यांच्यासोबत एकाच अधिकाऱ्याला प्रवेश असेल.खासगी व्यक्तींना विधानभवनात प्रवेश नाही. मंत्रालय अधिकारी व कर्मचारी यांनादेखील मर्यादित स्वरुपात प्रवेश दिला जाणार आहे.
सोशल डिस्टनसिंगचे काटेकोर पालन
सभागृहामध्ये सदस्यांकरिता एका आसनावर एक सदस्य अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच प्रेक्षक गॅलरी, विद्यार्थी गॅलरीमध्येदेखील सदस्यांची बसण्याची व्यवस्था आहे. तसेच सदस्यांना एका किटमध्ये एक फेस शिल्ड, मास्क, हॅडग्लोव्हज, हँड सॅनिटायझेशनची बॉटल देण्यात येणार आहे.
The monsoon session of the state legislature will be held for two days on July 5 and 6
महत्त्वाच्या बातम्या
- तालिबानशी चर्चा होते तर पाकिस्तानशी का नाही, मेहबुबा मुफ्ती यांचा सवाल ; अब्दुल्ला यांनी स्वीकारले पंतप्रधानांच्या बैठकीचे निमंत्रण
- तालिबानशी चर्चा होते तर पाकिस्तानशी का नाही, मेहबुबा मुफ्ती यांचा सवाल ; अब्दुल्ला यांनी स्वीकारले पंतप्रधानांच्या बैठकीचे निमंत्रण
- विजय शिवतारे यांच्या पत्नीचे गंभीर आरोप ; २७ वर्षांपासून माझ्यापासून अलिप्त
- कोल्हापूरात मराठा आंदोलन; मुंबईत दोनच दिवसांचे विधिमंडळ पावसाळी अधिवेशन; दिल्लीत पवारांच्या घरी मोदींना पर्याय देण्यासाठी बैठक