• Download App
    वक्फ बोर्डाच्या अधिपत्याखालील संस्थांच्या कारभारावर वचक; दरवर्षी आर्थिक अहवाल सादर करणे बंधनकारक|the management of institutions under the Wakf Board; It is mandatory to submit financial report every year

    वक्फ बोर्डाच्या अधिपत्याखालील संस्थांच्या कारभारावर वचक; दरवर्षी आर्थिक अहवाल सादर करणे बंधनकारक

    प्रतिनिधी

    मुंबई : वक्फ बोर्डाच्या अधिपत्याखालील संस्थांच्या कारभारावर नजर ठेवण्यासाठी शासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली असून, त्यांना दरवर्षी आर्थिक अहवाल सादर करणे बंधनकारक केले आहे. शिवाय वक्फ मिळकती भाडेतत्त्वावर देण्यासंदर्भातील नियमावलीही तयार करण्यात आली आहे the management of institutions under the Wakf Board; It is mandatory to submit financial report every year



    त्यामुळे धार्मिक स्थळांसह अन्य वक्फ संस्थांना वर्षभरातील कामे, देखभाल खर्च, कार्यक्रमांना येणारा खर्च याची इत्यंभूत माहिती शासनाला सादर करावी लागेल. यावर्षीचा अर्थसंकल्प 30 दिवसांत सादर करण्याचे आदेश बजावण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने 3000 संस्थांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. संबंधित वक्फ संस्थांनी महाराष्ट्र राज्य वक्फ ऑफ बोर्ड, छत्रपती संभाजीनगर येथील मुख्य कार्यालयात सर्व कागदपत्रे जमा करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

    राज्यातील मशीद, मदरसा, दर्गाह या वक्फ धार्मिक संस्थांचे देखभाल व व्यवस्थापन करण्यासाठी केंद्र शासनाने १९९५ मध्ये महाराष्ट्र वक्फ ऑफ बोर्डची स्थापना केली. राज्यातील मशीद, मदरसा, दर्गाह यांची नोंद औरंगाबाद येथील मुख्य कार्यालयात करणे गरजेचे आहे. पूर्वी अलिबाग येथील धर्मादाय आयुक्त कार्यालयात याविषयी कामकाज होत असे. आता मात्र छत्रपती संभाजीनगर येथे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

    the management of institutions under the Wakf Board; It is mandatory to submit financial report every year

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस