वृत्तसंस्था
मुंबई :मंत्रालयातील मुख्य भाग असलेल्या त्रिमूर्तीच्या मागे दारूच्या बाटल्यांचा ढिगारा आढळला आहे. संपूर्ण मंत्रालयात सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तरी या दारूच्या बाटल्या कशा काय पोचल्या ? ही दारु रिचवणारे नेमके आहेत तरी कोण? याची माहिती कोणालाच नाही. या अनागोंदी कारभाराचा ‘एबीपी माझा’कडून पर्दाफाश करण्यात आला आहे.( याबाबतची सत्यता फोकस इंडियाने तपासलेली नाही)The lot of liquor bottles found behind the The part called Trimurty of maharashtra mantralaya
राज्याचा गाडा ज्या मंत्रालयातून हाकला जातो. सर्वसामान्यांची तपासीणी केल्याशिवाय, पासशिवाय आतमध्ये प्रवेश दिला जात नाही. त्याच मंत्रालयात चक्क दारूच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळत आहे. एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात मंत्रालयातील दारूच्या बाटल्यांचा ढीग कैद झाला आहे.
एवढी मोठी सुरक्षा यंत्रणा असूनही मंत्रालयात दारूच्या बाटल्या आल्या कशा? मंत्रालयातील मुख्य भाग असलेल्या त्रिमूर्तीच्या मागील बाजूस या दारूच्या बाटल्यांचा ढिगारा आहे. विशेष म्हणजे संपूर्ण मंत्रालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत. तरी या दारूच्या बाटल्या आल्या कुठून आणि ही दारु रिचवणारे नेमके आहेत तरी कोण? याची माहिती कोणालाच नाही.
या दारूच्या बाटल्या मंत्रालयात आल्या कशा? कारण मंत्रालय कुठलं मॉल सेंटर नाही किंवा कुठलीही खाऊ गल्ली नाही. तर ते राज्याच मुख्यालय आहे. संपूर्ण राज्याचा कारभार या मंत्रालयातून पाहिला जातो. याच मंत्रालयात सर्वसामान्य जनता अडीअडचणी सोडवण्यासाठी आयुष्यातील गंभीर प्रश्न मांडण्यासाठी मंत्रालयात येतात.
जर सर्वसामान्यांना मंत्रालयात प्रवेश करायचा असेल तर येथील सुरक्षा यंत्रणांचा सामना करावा लागतो. त्यांची चौकशी केली जाते. पण मंत्रालयाची सुरक्षा यंत्रणा भेदून या दारुच्या बाटल्या आत आल्याच कशा? असा प्रश्न सध्या सर्वच स्तरांतून व्यक्त केला जात आहे.
दोषींवर कठोर कारवाई : राज्यमंत्री दत्तात्रय भरणे
या प्रकरणाची कसून चौकशी केली जाईल, तसेच हे कृत्य करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे. दत्तात्रय भरणे म्हणाले की, “ही अत्यंत गंभीर बातमी आहे.
याप्रकरणाची योग्य ती चौकशी करुन दोषींवर कारवाई केली जाईल.” त्यांनी सांगितलं की, मंत्रालयाची संपूर्ण सुरक्षा व्यवस्था ही पोलिस प्रशासनाकडेच असते. पण मंत्रालय म्हणजे, सर्व मंत्री, सर्व विभागांचा विषय येतो. हा केवळ गृहमंत्री किंवा पोलिसांचा विषय नाही.”
The lot of liquor bottles found behind the The part called Trimurty of maharashtra mantralaya
महत्त्वाच्या बातम्या
- डाळी, खाद्यतेलात भारत होणार आत्मनिर्भर, मोदी सरकारची खास योजना; सन्मान निधीचा नववा हप्तशेतकऱ्यांच्या खात्यात जमा
- पुणे : पुण्याला Zika Virus चा धोका? जिल्हाधिकाऱ्यांनी ७९ गावं ठरवली संवेदनशील ; आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश
-
Golden opportunity : अमेझॉन देतंय दरमहा 60 ते 70 हजार कमावण्याची संधी, फक्त चार तास करावे लागेल काम
- सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा म्हणाला – ऑलिम्पिकसाठी मेहनतीचे फळ मिळाले, पंतप्रधान स्वत : बोलले ही मोठी गोष्ट, सर्वांच्या सहकार्याने येथे पोहोचलो!