विशेष प्रतिनिधी
मुंबई : Fadnavis मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत संविधानातील चर्चेत सहभागी होऊन आपले मत मांडले. यावेळी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे समाजात मोठे परिवर्तन झाल्याचे स्पष्ट केले. संविधानाला धोका नाहीये. धोका झाला होता, तो आता संपलेला आहे. पुढील निवडणुकांसाठी नवीन काही तरी मुद्दा काढा, नवीन नरेटीव्ह तयार करा, दुसऱ्या गोष्टींवर आपली ऊर्जा खर्च करावी, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना लगावला. दरम्यान, ठाकरे गटाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भाषणाचे कौतुक करण्यात आले. तसेच या भाषणाचे एक पुस्तक प्रकाशित करण्याची विनंती ठाकरे गटाकडून करण्यात आली.Fadnavis
देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारताचे संविधान हे 10-12 देशांच्या संविधानातील गोष्टींपासून तयार झाल्याचा आरोप करतात. पण तसे नाही. हे पूर्णतः भारतीय तत्वांवर तयार करण्यात आलेले संविधान आहे. संविधान सभेमध्ये भारताच्या ध्वजावर चर्चा सुरू होती, तेव्हा राधाकृष्णन म्हणाले, जोवर आपण सद्गुणांवर चालत नाही, तोवर आपण पवित्रतेचे ध्येय साध्य करू शकत नाही किंवा सत्यही गाठू शकत नाही. अशोक चक्र हे कायद्याचे व धर्माचे चक्र आहे. सत्य गाठायचे असेल तर धर्माच्या वाटेनेच जावे लागेल. त्यामुळे या ध्वजाखाली जो काम करेल, सत्य व धर्म त्याचे आचरणाचे तत्व असले पाहिजे.
…तोपर्यंत आपण सत्य व सद्गुणांचा वारसा सांगू शकत नाही
धर्म हे सातत्याने पुढे जाणारे गतिमान असे चक्र आहे. यापूर्वीच्या काळात आपल्याला जो त्रास सहन करावा लागला, तो बदलांना प्रतिकार केल्यामुळे… आपल्यापुढे अनेक आव्हाने आहेत. काळाच्या बरोबरीने चालण्याचे धैर्य आपण दाखवले नाही तर आपण मागे राहू. जात, अस्पृश्यता हे जोपर्यंत आपण त्यागत नाही, तोवर आपण सत्य व सद्गुणांचा वारसा सांगू शकत नाही. हे चक्र आपल्याला हेच सांगते की, एका ठिकाणी थांबलो की एकेठिकाणी थांबलो तर मृत्यू आहे, ते चक्र सतत फिरत राहिले तर तिथेच जीवन आहे, असे फडणवीस यांनी सांगितले.
संविधानाचे शिल्पकार हे बाबासाहेब आंबेडकर
1946 मध्ये भारतीय स्वातंत्र्य चळवळ एका निर्णायक वळणावर पोहोचली, तेव्हा इंग्रजांनी कॅबिनेट मिशन पाठवले. त्या कॅबिनेट मिशनने रिपोर्ट दिला की स्वातंत्र्य भारताचे संविधान तयार करावे लागेल. त्यावेळी संविधान सभा निर्माण करण्याचा निर्णय झाला. 1935 चा कायदा हा एक प्रकारे संविधान होते. पण ते इंग्रजी राज्य चालवण्यासाठी भारतीय लोकांचा सहभाग असावा यासाठी होते. ते आपण संविधानात परावर्तित केले नाही. संविधानाने एकएक आर्टिकलवर चर्चा केली आहे. मग स्वीकार केला आहे. 165 दिवस ही चर्चा झाली. 9 डिसेंबर 1946 रोजी पहिली चर्चा तर 24 जानेवारी 1950 रोजी शेवटची चर्चा झाली. तीन वर्षे हे काम सुरु होते. जगाच्या पाठीवर सर्वात प्रदीर्घ काम ज्या संविधान सभेने काम केले ती ही भारताची संविधान सभा होती. 389 सदस्य यामध्ये होते. 9 डिसेंबर 1946 ला पहिले अधिवेशन झाले. तेव्हा सुरुवात ही वंदे मातरम् गीताने झाली. आचार्य कृपलानी यांनी पहिले भाषण केले होते. एकट्या बाबासाहेब आंबेडकर यांनी बहुतांश ड्राफ्ट तयार केला. म्हणून संविधानाचे शिल्पकार हे बाबासाहेब आंबेडकरांना मानतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
संविधानाची उद्देशिका भारताची निती सांगते
आता संविधानमध्ये बदल झाला आहे. मसुदा वेळी 7 हजारांहून अधिक सुधारणा सुचविल्या होत्या. त्यातील 2 हजार स्वीकारल्या. त्यानंतर 106 सुधारणा झाल्या. ओबीसी आयोगाला संविधान दर्जा, जीएसटीसाठी झालेली सुधारणा ही नुकतीच झालेली आहे. महिलांना संसदेत व विधानसभेत 33 टक्के आरक्षण देण्याची सुधारणा आहे. देशाला दिशा देणाऱ्या या सुधारणा मोदी सरकारच्या काळात झाल्या आहेत. राजकीय नेते बदलले, राजकीय राजे बदलले. पण समाज एक राहिला. त्यातील पारंपरिक भाव एक राहिला. त्यामुळे राजकीय व्यवस्था तयार करायची होती, तेव्हा त्यावर नियंत्रण ठेवणारे संविधान तयार झाले. भारताची निती काय, हे संविधानाची उद्देशिका सांगते, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
संविधानात सर्वात मोठी ठेव ही लोकशाही
आम्ही भारतीय लोक सांगतो म्हणून हे जोपासण्याची जबाबदारी आपली आहे. पाश्चिमात्य देशातील हे संविधान नाही. ठिकठिकाणी बंधुता हे शब्द दिसतात. हे गौतम बुद्धांचे तत्वज्ञान आहे. संधीची समानता त्यांनी दिली. जात, धर्म यांच्या आधारे संधी दिली जाणार नाही. सर्वांना समान संधी दिली जाईल. लंकेतील सीतेची सुटकादेखील संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये दाखवलेली आहे. ती यासाठी दाखवलेली आहे की आम्हाला या संविधानाचा नारी सन्मानासाठी वापर करायचा आहे, हे त्यातून अभिप्रेत करण्यात आलेले आहे. गीतेचा उपदेश देखील याच संविधानात दाखवला आहे. या तत्त्वांवर उभं राहिलेलं हे संविधान आहे. या संविधानात सर्वात मोठी ठेव ही लोकशाही आहे, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.
विषमता दूर होईपर्यंत आरक्षण राहील – फडणवीस
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानात 50 वर्षांसाठी आरक्षण दिले होते. त्यावेळी त्यांना असे वाटले होते की, 50 वर्षांत हा देश आपली विषमता संपवू शकेल. दुर्दैवाने आमच्या समाज व्यवस्थेने ही विषमता दूर केली नाही. त्यामुळे पहिल्यांदा अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्याला मुदतवाढ देण्यात आली. नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने या आरक्षणाला मुदतवाढ दिली. या प्रकरणी जोपर्यंत ही विषमता आहे, तोपर्यंत आम्ही संधीची समानता हे जे काही आपले संवैधानिक मूल्य आहे, त्या मूल्यांप्रती सगळे समानस्तरावर येईपर्यंत हे आरक्षणच कायमच ठेवावे लागेल हे देखील या निमित्ताने आपण मान्य केले पाहिजे.
जोपर्यंत चंद्र-सूर्य… तोपर्यंत संविधान कोणीही बदलू शकत नाही
संविधान बदलणार असा टाहो फोडणाऱ्यांनी आणि छाती बदडणाऱ्यांनी समजून घेतले पाहिजे की, आता संविधान बदलण्याचा अधिकारी कोणालाच नाही. आपले संविधान सातत्याने बदलण्याचे काम 1967 ते 1977 या कालखंडात झाले. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने हे लक्षात घेतले. संविधानातील लवचिकता अशीच राहिली, तर जे बाबासाहेबांनी सांगितले कुठलेही संविधान वाईट नसते, संविधान वागवणारे कसे आहेत, या आधारावर ते संविधान चांगले किंवा वाईट ठरते. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे, तोपर्यंत भारताचे संविधान कोणीही बदलू शकत नाही, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शहाबानोचा दिलेला निकाल बदलण्यासाठी तुम्ही संविधान बदलले. तर तीन तलाक संपवण्यासाठी आम्ही त्याठिकाणी संशोधन केले. या संविधानाने सीतेची मुक्तता दाखवली आहे. पंडीत नेहरूंनी 370 कलम घालण्यासाठी आग्रह केला होता. त्यावेळी मी ड्राफ्ट तयार करणार नसल्याचे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले. रस्ते आमच्याकडून बनवून घ्यायचे, रेशन आमच्याकडून घ्यायचे, सोयी आमच्याकडून घ्यायच्या, सगळ्या गोष्टी आमच्याकडून घ्यायच्या आणि संविधानातच स्वतंत्र संविधान आणि स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा मिळवायचा हे मला मान्य नाही, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. त्यावर खूप चर्चा झाल्या, आणि शेवटी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी एकाच गोष्टीवर मान्यता दिली की, 370 हे कलम कायमचे नाही, तर तात्पुरते असेल. डॉ. बाबासाहेबांचे ते स्वप्न नरेंद्र मोदींनी पूर्ण केले आणि 370 कलम संपवण्याचे काम केले, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना इतिहास लक्षात ठेवण्याचा सल्ला
विरोधी पक्ष इतिहास विसरतो, जे इतिहास विसरता त्यांना वर्तमान असते, पण भविष्य नसते. इतिहास विसरणाऱ्यांचा भूगोल कधीच शाबूत राहत नाही. त्यामुळे इतिहास लक्षात ठेवा, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिला. देशाच्या संविधानावर जी संकटे आली, त्या संकटांमुळे हे संविधान इतके परिपक्व झालेले आहे की, या संविधानाशी कुणी छेडछाड करू शकत नाही. तसेच त्याला अपाय करू शकत नाही.
संविधान प्रत्येक व्यक्तीच्या विकासाचे अस्त्र
सध्याचे शतक भारताचे शतक आहे. ज्याप्रमाणे भारताची प्रगती चाललेली आहे. आज लोक म्हणतात अमेरिका, चीन आणि इंडिया इज वर्ल्ड. या तीन देशांच्या भोवती जग सीमटलेले आपल्याला पाहायला मिळते. या संपूर्ण वाटचालीमध्ये, भारताच्या युगामध्ये भारतातील प्रत्येक व्यक्तीच्या विकासाचे अस्त्र काही असेल, तर ते भारताचे संविधान आहे. न्याय देणारे, प्रत्येकाच्या स्वप्नांना पंख देणारे, जगातील सर्वोत्तम संविधान दिल्याबद्दल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे शतश: आभार मानतो, त्यांना या संविधानाला शतश: नमन करतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
ठाकरे गटाकडून फडणवीसांच्या भाषणाचे कौतुक
दरम्यान, ठाकरे गटाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संविधानावरील भाषणाचे कौतुक करण्यात आले. ठाकरे गटाचे आमदार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या भाषणाचे पुस्तक तयार करण्याची मागणी विधिमंडळात केली. मुख्यमंत्री महोदयांचे आजचे भाषण अप्रतिम झालेले भाषण आहे. वेगवेगळे संदर्भ देणारे भाषण आहे. आपले हे भाषण पुस्तक रुपाने प्रसिद्ध झाले, त्याची कॉपीज आम्हाला दिल्यात, मध्यंतरीचा राजकीय भाग वगळता आला, तर वगळा. परंतु, इतके उत्कृष्ट संदर्भ असलेले एकाएका घटनेची उत्तम प्रकारची माहिती आली आहे. आपल्या विधिमंडळाच्या वतीने मुख्यमंत्री महोदयांचे भाषण पुस्तक रुपाने प्रकाशित केले, तर चांगले होईल, असे शब्दांत भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भाषणाचे कौतुक केले.
The Indian Constitution was not brought by the US; The Constitution has brought about a major change in society; Thackeray group praises Fadnavis’ speech
महत्वाच्या बातम्या
- MK Stalin तामिळनाडूत DMK स्टालिन अण्णा सरकारची दुटप्पी भूमिका; हिंदीला लाथा, अन् उर्दूला डोक्यावर घेऊन नाचा!!
- UPI : १ एप्रिलपासून UPI मध्ये होणार मोठा बदल!
- धर्मनिरपेक्षता आणि समाजवादाचा “शाब्दिक खेळ”; देवेंद्र फडणवीसांनी उलगडला आणीबाणीतला “गेम”!!
- Bhupesh Baghel : महादेव बेटिंग अॅप प्रकरणात भूपेश बघेल यांच्या घरावर CBIचे छापे