वृत्तसंस्था
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील हे 20 जानेवारीनंतर लाखो समर्थकांसह मुंबईत धडक देणार आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, त्यामुळे त्यांना मुंबईत येण्यापासून रोखा, अशी विनंती हेमंत पाटील यांनी दाखल केली होती. मात्र शुक्रवारी मुंबई हायकोर्टाने ती याचिका दाखल करून घेण्यास स्पष्ट नकार दिला. The High Court made it clear that it will not stop the Jarangs
मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय व न्या. रफिक डॉक्टर म्हणाले, ‘आम्ही कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी बसलेलो नाही. ते सरकारचे काम आहे. आमच्याकडे बरीच कामे आहेत. आंदोलकांना आम्ही कसे रोखणार?’ असे न्यायालयाने फटकारले.दुसरीकडे, मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच करण्याची पूर्ण तयारी केली आहे. त्यासाठी मराठा समाजात गावागावात जनजागृती केली जात आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण थांबवल्यावर प्रतिक्रिया देताना राज ठाकरेंनी सरकारला लगावला टोला!
मात्र ते ज्या दिवशीपासून मुंबईत आंदोलन सुरू करणार आहेत त्याच दिवशी ओबीसी आरक्षण बचाव समितीचे कार्यकर्तेही मुंबईत उपोषण करणारे आहेत. त्यामुळे दोन्ही गट आमनेसामने येऊन तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याची भीती याचिकेत दाखल करण्यात आली होती. मात्र न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेण्यासच नकार दिला. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील संभाव्य अडथळा दूर झाला आहे.
The High Court made it clear that it will not stop the Jarangs
महत्वाच्या बातम्या
- विधानसभा अध्यक्षांचा कौल शिंदेंच्या पारड्यात; अजितदादांच्या मुख्यमंत्री पदाची चर्चा विरली हवेत!!
- उपराष्ट्रपतींना अयोध्येचे निमंत्रण; आधी वेळ कळवून परिवारासह घेणार श्री रामलल्लांचे दर्शन!!
- या वर्षी दहा पैकी नऊ सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग नफ्यात राहण्याची चिन्हं!
- ग्रीस समलिंगी विवाह, दत्तक प्रक्रियेस कायदेशीर मान्यता देणार!