विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना वंदन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करुन महाराष्ट्राला अभिमान, स्वाभिमान, राष्ट्राभिमान शिकवला. संकट कितीही मोठे असले तरी डगमगायचे नाही, हा विश्वास महाराष्ट्राच्या मातीत रुजवला. आजही महाराजांचे कार्य, त्यांचे विचार आपल्यासाठी प्रेरणादायी आहेत, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांना अभिवादन केले. The government is working hard on the thoughts of Shivaji Maharaj; Statement by Ajit Pawar
पुण्यदिनानिमित्त अभिवादन करताना पवार म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील अठरापगड जातीच्या मावळ्यांना सोबत घेऊन रयतेचे राज्य, स्वराज्य स्थापन केले. संकट आणि शत्रू कितीही बलाढ्य असला तरी डगमगायचे नाही. जिद्द, बुद्धी, चातुर्य, संयमानं त्याला पराभूत करता येते हे महाराजांनी वारंवार सिद्ध केले. महाराजांचे हे कर्तृत्व व निर्माण केलेला राज्यकारभाराचा आदर्श प्रगत, पुरोगामी, शक्तिशाली महाराष्ट्र घडवण्यासाठी आपल्याला सदैव प्रेरणा देईल. महाराजांनी दिलेल्या विचारांवर राज्य सरकारची वाटचाल सुरु राहील.
The government is working hard on the thoughts of Shivaji Maharaj; Statement by Ajit Pawar
महत्त्वाच्या बातम्या
- Raj Thackeray : भाजपचा भोंगा, लेक्चरबाजी, सरडा, अक्कलदाढ या शब्दांच्या भडिमाराने राज ठाकरेंना राष्ट्रवादी – शिवसेनेतून प्रत्युत्तर!!
- UPA Chairman : शरद पवार कोल्हापूरात म्हणाले, यूपीए अध्यक्षपदात रस नाही…!!, पण करणार आहे कोण…??
- पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर लंडन येथे हल्ला; इम्रान खान यांच्या समर्थकांवर संशय
- लाऊडस्पीकर काढा, नाहीतर मशिदींसमोर हनुमान चालीसा लावेन; राज ठाकरे यांचा
- चंद्रदर्शन झाल्याने रमजानचे रोजे सुरू
- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा आज होणार फैसला; अविश्वास प्रस्तावावर मतदान
- रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम ; खाद्यतेल महागणार सूर्यफूल तेलाचा पुरवठा २५ टक्क्यांनी होऊ शकतो कमी
- रशियन हवाई दलाची चार क्षेपणास्त्रे नष्ट