विशेष प्रतिनिधी
जालना : कोरोनाची तिसरी लाट येणार का? असा प्रश्न बऱ्याच लोकांना सतावतो आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एक आनंदाची बातमी दिली आहे. राज्यातील एकूण 8 कोटी लोकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. सध्या ओमायक्रॉन या विषाणूमुळे लोकांनी धास्ती घेतलेली आहे. पुन्हा लॉक डाऊन नको, पुन्हा कोरोना नको, पुन्हा तीच दुरावस्था समाजाची नको यासाठी लोक देवाकडे अक्षरश: प्रार्थना करताना दिसून येत आहेत.
The first dose taken by 8 crore people in Maharashtra, 100% vaccination will be done in next 15-20 days; Health Minister Rajesh Tope
पण येत्या 15 ते 20 दिवसांमध्ये महाराष्ट्रात लसीकरण अतिशय चांगल्या पध्दतीने होईल आणि महाराष्ट्रात 100 टक्के लसीकरण होणार असल्याचेही आरोग्य मंत्र्यांनी बोलून दाखवले आहे. ते जालन्यातील पत्रकारांशी बोलत होते. ओमायक्रॉन हा संसर्गजन्य असला तरी तो धोकादायक नाही. असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.
एखाद्या व्हायरसमध्ये म्युटेशन होणे हे अतिशय स्वाभाविक गोष्ट आहे. पण जितके जास्त म्युटेशन्स होत जातात तितकी त्याची तीव्रता कमी होत जाते.
तो पुढे म्हणतात की, ओमयक्रोन बाबत आम्ही सुरुवातीपासून सांगत आलेलो आहोत की हा जास्त भीतीदायक व्हेरिएंट नाही. तरीपण सर्वांनी काळजी घेणे, बारकाईने लक्ष ठेवणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. राज्यात दररोज दीड ते दोन लाख नागरिकांची तपासणी होत असल्याचीही माहिती त्यांनी यावेळी दिली. राज्य सरकारकडून सर्व ती खबरदारी घेतली जात आहे.
The first dose taken by 8 crore people in Maharashtra, 100% vaccination will be done in next 15-20 days; Health Minister Rajesh Tope
महत्त्वाच्या बातम्या
- Election : राज्यातील 32 जिल्ह्यांतील 105 नगरपंचायतींसाठी मतदान सुरू, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, वाचा सविस्तर
- पंजाबमध्ये विरोधकांचा भाजपमध्ये जंबो प्रवेश; वीस माजी मंत्री, खासदारासह आमदारांचा प्रवेश
- पुणे : महापालिकेच्या तब्बल १८ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले ; वेतनाची बिले तयार करण्यासाठी २० अतिरिक्त कर्मचारी नियुक्त
- IMPORTANT NEWS : म्हाडाची ऑनलाईन परीक्षा फेब्रुवारीत होणार ;वाचा सविस्तर