• Download App
    सुप्रीम कोर्टात आज 16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी, यानंतरच होणार मंत्रिमंडळ विस्तार|The disqualification of 16 MLAs will be heard in the Supreme Court today, after which the Cabinet will be expanded

    सुप्रीम कोर्टात आज 16 आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी, यानंतरच होणार मंत्रिमंडळ विस्तार

    वृत्तसंस्था

    मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकारच्या स्थापनेला 32 दिवस उलटून गेले आहेत. अजूनही केवळ मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हेच कारभार पाहत असल्यावरून विरोधक सरकारवर टीका करत आहेत. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे मंगळवारी स्पष्ट केले. तथापि, बुधवारी सर्वोच्च न्यायालयात 16 आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणीनंतरच विस्तार होणार हे स्पष्ट आहे.The disqualification of 16 MLAs will be heard in the Supreme Court today, after which the Cabinet will be expanded

    मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत मंगळवारी पुण्यात विविध कार्यक्रम झाले. यावेळी शिंदे म्हणाले, आम्ही सध्या खूप काम करत असून जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेत आहोत. सरकार व्यवस्थित काम करत असून लवकरच मंत्रिमंडळ विस्तारही करण्यात येईल. आम्ही जी भूमिका घेतली त्याचे स्वागत जनतेने केले असून ते आम्हाला समर्थन देत आहेत.



    अतिवृष्टीमुळे जी जीवित आणि वित्तहानी झाली आहे. पीक नुकसानीबाबतही आढावा घेण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज समाधी विकास आराखड्यास कोणतीही स्थगिती देण्यात आली नाही. भीमाशंकर येथील विकासकामे उत्तम दर्जाची करावीत, अशा सूचनाही त्यांनी या वेळी केल्या.

    16 आमदारांवर सुनावणी

    बुधवारी (3 ऑगस्ट) सर्वोच्च न्यायालयात शिवसेनेच्या 16 बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणी आहे. यावर लगेचच निर्णय होईल की नाही, हे स्पष्ट नसले तरी न्यायालयाचा कल कळण्याची शिंदे गटाला आशा आहे. त्यामुळे रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार शनिवारपर्यंत (6 ऑगस्ट) मार्गी लागेल, असे शिंदे गटातील आमदार सांगत आहेत. राज्य मंत्रिमंडळ विस्तार गुजरात पॅटर्नप्रमाणे होईल, अशीही एक चर्चा रंगली आहे.

    The disqualification of 16 MLAs will be heard in the Supreme Court today, after which the Cabinet will be expanded

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Tata Cancer Hospital : मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पिटलला धमकीचा मेल, पोलिसांनी तपास सुरू केला

    CM Fadnvis : सायबर गुन्हे घडण्यापूर्वीच रोखण्यासाठी जनजागृती आवश्यक – मुख्यमंत्री फडणवीस

    Devendra Fadnavis : महाराष्ट्र शासन अन् विधि सेंटर फॉर लिगल पॉलिसी यांच्यात सामंजस्य करार

    Icon News Hub