• Download App
    देशात अवदसा आली ती फक्त मोदींनी ताट वाजवल्यामुळेच, प्रणिती शिंदेंची जहरी टीका The codes in the country, only Modi's tarantry, a strong criticism of Praniti Shinde

    देशात अवदसा आली ती फक्त मोदींनी ताट वाजवल्यामुळेच, प्रणिती शिंदेंची जहरी टीका

    कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात ताटं वाजवल्यामुळेच आपल्या भारत देशात अवदसा आली. तसेच देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूलासुद्धा पंतप्रधान मोदीच जबाबदार आहेत, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली आहे. The codes in the country, only Modi’s tarantry, a strong criticism of Praniti Shinde


    विशेष प्रतिनिधी

    सोलापूर : काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात ताटं वाजवल्यामुळेच आपल्या भारत देशात अवदसा आली. तसेच देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूलाही पंतप्रधान मोदीच जबाबदार आहेत, अशी टीका शिंदे यांनी केली आहे.

    पुढे प्रणिती शिंदे म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी माध्यमांसमोर यायला घाबरतात. ते एकदाही माध्यमांसमोर आले नाहीत. फक्त मतदानाच्या वेळीच ते माध्यमांसमोर समोर येतात आणि मतदान मागतात, त्यांना लाज बरी वाटत नाही. पंतप्रधान मोदी यांचं भूत सध्या वोटिंग मशीनमध्ये जाऊ बसलं आहे. हाताला (कॉंग्रेस) मतदान केलं तर ते भाजपला जातं.



    शिंदे म्हणाल्या, ‘आधी शिक्का मारून केलं जाणारं मतदानंच योग्य होतं. बॅलेट पेपर परत आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत,” अशा शब्दांत आमदार प्रणिती शिंदे यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली.

    The codes in the country, only Modi’s tarantry, a strong criticism of Praniti Shinde

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !