• Download App
    cloudburst ढगफुटीचा भोवरा सुरत आणि अहिल्या नगरच्या दिशेने सरकला; नाशिकवरचे संकट टळल्याची शक्यता!!

    ढगफुटीचा भोवरा सुरत आणि अहिल्या नगरच्या दिशेने सरकला; नाशिकवरचे संकट टळल्याची शक्यता!!

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : मुंबई, पुण्यानंतर नाशिकमध्ये मुसळधार पावसाचे संकट ओढवले असताना ढगफुटीच्या इशाऱ्यानंतर प्रशासनाने मोठी खबरदारी घेतली. गोदावरी नदीच्या परिसरातील टपऱ्या, दुकाने हटविण्यात आली. ६ जुलैच्या रात्रीपासून मागील नाशिकच्या काही भागांत जोरदार पाऊस कायम राहिला. पालघरमध्ये पूरस्थिती निर्माण करणारा भोवरा नाशिकच्या दिशेने सरकण्याचे भाकीत वर्तविण्यात आले होते. परंतु हा भोवरा सुरतच्या दिशेने सरकल्याने नाशिकवरील अतिवृष्टीचे संकट टळण्याची शक्यता आहे. पण पावसाचा जोर कायम राहणार आहे.

    पालघरमध्ये काल 450 मिलिमीटर पाऊस पडला. त्यानंतर हा ढगांचा भोवरा त्र्यंबकेश्वर–नाशिक मार्गे जाण्याची शक्यता व्यक्त केली होती. पण हा भोवरा उत्तर दिशेला सुरतला आणि दक्षिण दिशेला अहिल्यानगरमधील अकोले परिसरात सरकल्याचे दिसत आहे. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगितले जात आहे.

    – ढगफुटीचा धोका टळला?

    पावसाचा भोवरा दुसरीकडे सरकल्याने नाशिक, त्र्यंबकेश्वरमध्ये ढगफुटीचा धोका काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. पालघरहून इगतपुरी, त्र्यंबकेश्वरच्या दिशेने वाहून येणारे ढग गुजरातच्या सुरत आणि अहिल्यानगरमधील अकोलेच्या दिशेने सरकलेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. परंतु, नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर भागात मुसळधार पावसाची शक्यता कायम असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे विनाकारण घराबाहेर पडू नये, असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.

    नाशिक जिल्ह्यातील पाऊस

    कळवण – 40 नांदगाव – 1, सटाणा बालगण – 47 निफाड- 45.2 सुरगणा – 149 सिन्नर – 74, येवला- 15 दिंडोरी – 58, पेठ – 61, इगतपुरी – 200, पिंपळगाव बसवंत – 51.5, देवळा – 40, त्र्यंबकेश्वर – 125 मिलिमीटर

    – धरणात पाणीसाठा वाढला

    नाशिकमध्ये धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. काल रात्रीपासून धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण 37 % भरले, तर दारणा धरणातील पाणीसाठा 21 % वर पोहोचला आहे. भावली धरण 56 % क्षमतेपर्यंत भरले आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांमधील एकूण पाणीसाठा 28 % वर पोहोचलाय. सततच्या पावसामुळे धरण क्षेत्रातील परिस्थितीवर प्रशासन बारकाईने लक्ष ठेवून आहे. धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्याने नाशिककरांना दिलासा मिळाला आहे.

    The cloudburst vortex moved towards Surat and Ahilya Nagar.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra TET : टीईटी अट सक्तीविरोधात नऊ जुलैला ‘शाळा बंद’ आंदोलन:शिक्षक संघटनांनी दिला राज्य शासनाला इशारा

    FDA Raids : केमिकल दुधाच्या रॅकेटवर ‘एफडीए’ची कारवाई; 5 जिल्ह्यांत छापे, 1.48 कोटींचा मुद्देमाल जप्त

    Lonavala Tourist : लोणावळ्यात पर्यटकांवर निर्बंध; कलम 163 लागू; अतिवृष्टीमुळे धोकादायक पर्यटनस्थळांवर जाण्यास बंदी, पुणे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश