• Download App
    केंद्र सरकार राज्यांना जीएसटीची रक्कम परत देतेच, पण महाराष्ट्राने पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करावा; फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर । The central government reimburses the states for GST, but Maharashtra should reduce VAT on petrol and diesel; Fadnavis's reply to Pawar

    केंद्र सरकार राज्यांना जीएसटीची रक्कम परत देतेच, पण महाराष्ट्राने पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करावा; फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे नेते आणि भाजपचे नेते पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकताना दिसत आहेत. केंद्र सरकारने पेट्रोल – डिझेलचा उत्पादन शुल्कात अनुक्रमे 5.00 आणि 10.00 रुपयांची कपात केल्यानंतर अनेक राज्यांनी त्यावरचा मूल्यवर्धित कर अर्थात व्हॅट कमी करून पेट्रोल-डिझेल ग्राहकांना दिलासा दिला आहे. The central government reimburses the states for GST, but Maharashtra should reduce VAT on petrol and diesel; Fadnavis’s reply to Pawar

    पण महाराष्ट्रा महा विकास आघाडी सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. यावर बारामतीत दिवाळी साजरी करायला आलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर त्यांनी केंद्र सरकारकडे जीएसटीचे महाराष्ट्राचे पैसे परत देण्याची मागणी केली. हे पैसे परत आल्यावर महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचा निर्णय घेता येईल, असे पवार म्हणाले. एक प्रकारे महाराष्ट्राने पेट्रोल-डिझेल वरचा व्हॅट कमी करण्याचा विषय शरद पवारांनी जीएसटीच्या पैशांची जोडला.



    शरद पवारांच्या या मुद्द्याला माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. फडणवीस म्हणाले, की केंद्र सरकार नियमितपणे सर्व राज्यांचे जीएसटीचे पैसे देत असते ते याही वर्षी महाराष्ट्राला मिळतील. पण केंद्र सरकारने ज्या अर्थी पेट्रोल आणि डिझेल यांच्या उत्पादन शुल्कात अनुक्रमे 5.00 आणि 10.00 रुपयांची कपात केली आहे त्या अर्थी 7 टक्के कर कमी होतो. परंतु, राज्य सरकारने व्हॅटमध्ये आणखी कपात करून महाराष्ट्रातल्या जनतेला दिलासा द्यावा, अशी आमची मागणी आहे. जीएसटीचे पैसे आणि राज्य सरकारने पेट्रोल डिझेलवरचा व्हॅट कमी करणे याचा एकमेकांशी काही संबंध नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

    The central government reimburses the states for GST, but Maharashtra should reduce VAT on petrol and diesel; Fadnavis’s reply to Pawar

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस