विशेष प्रतिनिधी
चिपळूण : उद्धव ठाकरे मुख्यमंत्री म्हणून आल्यापासून राज्यावर एकामागून एक संकटे येत आहेत. राज्यावरील येणारी ही संकटे मुख्यमंत्र्यांचा पायगुण आहे. कोरोना ही मुख्यमंत्र्यांचीच देणे आहे. मुख्यमंत्री आले कोरोना घेऊनच आले. पाय पाहायला पाहिजे, पांढरे पाय आहेत का? असा हल्लाबोल केंद्रीय लघू उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. The calamities on the state are due to Chief Minister, Narayan Rane’s criticism of Uddhav Thackeray
रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यात असलेल्या तळीये गावावर दरड कोसळली. राणे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी चिपळूणच्या बाजारपेठेत जाऊन पाहणी केली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन राणे यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोलत केला.
राणे म्हणाले , पाठांतर करून यायचे आणि लोकांमध्ये जाऊन बोलायचे. या राज्यामध्ये मुख्यमंत्री नाही, प्रशासन नाही, अशी भयावह परिस्थिती सध्या येथे आहे. गेल्या चार दिवसांपासून लोक हे अधिकाऱ्यांना जाब विचारत होते. काही कल्पना दिली नाही. लोकांना धोका लक्षात घेऊन स्थलांतरीत करायला हवे होते. त्यांची जेवणाची व्यवस्था करायला हवी होती. हे सर्व सरकारकडून केले गेले पाहिजे होते. सरकारने काहीच केलेले नाही. या सर्वांना जबाबदार हे प्रशासन आहे.
The calamities on the state are due to Chief Minister, Narayan Rane’s criticism of Uddhav Thackeray
महत्त्वाच्या बातम्या
- Mann ki Baat : राष्ट्रगीतावर अनोखे अभियान ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापर्यंत, जाणून मोदींच्या संबोधनातील महत्त्वाचे मुद्दे
- Pegasus Issue : पेगासस वादावरून माकप खासदाराची सुप्रीम कोर्टात धाव, SIT चौकशीसाठी याचिका दाखल
- Raj Kundra Pornography Case : शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्या संयुक्त खात्यात परदेशातून पैसे; आता ईडी करणार मनी लॉन्ड्रिंगची चौकशी
- गल्लत गोल्ड मेडलची : प्रिया मलिकने वर्ल्ड कॅडेट रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण, लोकांना वाटले ऑलिम्पिक गोल्ड
- मल्ल्याचे प्रत्यार्पण : परराष्ट्र सचिव शृंगला म्हणाले – ब्रिटनने दिले आश्वासन, पळपुटा मल्ल्या परत येण्याची आशा वाढली