• Download App
    ठाणे : माजीवडा येथील लोढा लक्सुरियातील मीटर रूमला लागली आग, खोलीतील ८१ मीटर बॉक्स जळून खाक । Thane: A fire broke out in the meter room of Lodha Luxuria at Majivada.

    ठाणे : माजीवडा येथील लोढा लक्सुरियातील मीटर रूमला लागली आग, खोलीतील ८१ मीटर बॉक्स जळून खाक

    आग पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचली होती.यावेळी मोठया प्रमाणात धूर झाल्याने धूर हा चौथ्या मजल्यापर्यंत गेला होता. Thane: A fire broke out in the meter room of Lodha Luxuria at Majivada.


    विशेष प्रतिनिधी

    ठाणे : बुधवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास माजीवडा येथील लोढा लक्सुरिया, वेस्ट गेट ‘सी’ या २७ मजली बिल्डिंगच्या तळमजल्यावरील एमएसईडीसीच्या मीटर रूमला आग लागल्याची घटना समोर आली.या आगीत त्या खोलीतील ८१ मीटर बॉक्स जळून खाक झाले आहेत.

    या घटनेत कोणतीही जीवितहानी नाही, कोणतीही दुखापत झालेली नाही.दरम्यान आग पहिल्या मजल्यापर्यंत पोहोचली होती.यावेळी मोठया प्रमाणात धूर झाल्याने धूर हा चौथ्या मजल्यापर्यंत गेला होता.या आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.



    दरम्यान या घटनेची माहिती मिळताच ,एमएसईडीसी अधिकारी, तसेच ठाणे महापालिका अग्निशमन दल आणि प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेतली.दरम्यान यावेळी १-फायर इंजिन आणि १-जंबो वॉटर टँकर पाचारण केले होते.

    Thane : A fire broke out in the meter room of Lodha Luxuria at Majivada

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Eknath Khadse : पितळ उघडं पडल्यावरही खडसे जावयाच्याच बाजूने!

    Prithviraj Chavan : सनातन संस्थेला दहशवादी म्हणणे भोवले; पृथ्वीराज चव्हाण यांना 10 कोटींची मानहानीची नोटीस

    Municipal Commissioner : पालिका आयुक्त ‘तुम बाहेर जावो’ म्हणाले,अन घोटाळा झाला !