• Download App
    अटकेच्या शक्यतेने मनसैनिक भडकले; रस्त्यावर उतरण्याचा ठाकरे - पवार सरकारला इशारा!!Thackeray warns Pawar government to take to the streets mns

    Raj Thackeray : अटकेच्या शक्यतेने मनसैनिक भडकले; रस्त्यावर उतरण्याचा ठाकरे – पवार सरकारला इशारा!!

    प्रतिनिधी

    मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर संभाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मंगळवारी कलम ११६, ११७, मुंबई पोलीस कायदा अधिनियम १३५ आणि १५३ अ अंतर्गत गुन्ह्याची कारवाई केली आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या अटकेच्या शक्यतेने मनसैनिकांमध्ये प्रचंड संताप उसळला असून राज ठाकरे यांना नुसता हात लावला तरी मनसैनिक रस्त्यावर उतरून सरकारला धडा शिकवतील, असा इशारा मनसेने दिला आहे.  Thackeray warns Pawar government to take to the streets mns

    राज ठाकरे यांच्या सभेला ज्या अटी आणि शर्ती घातल्या होत्या, त्यावेळीच राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यासाठी हे सुरू असल्याचे समजत होते. पण राज ठाकरे आजही आपल्या भूमिकेवर ठाम असून महाराष्ट्र सैनिक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करतील, असे मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राज्य सरकारला इशारा देखील दिला आहे.

    – मनसेचा राज्य सरकारला इशारा

    जर आम्हाला असे अन्यायकारकरित्या अडकविण्याचा प्रयत्न केला जात असेल तर सरकारने तयार राहावे. राज ठाकरेंना अटक झाली तर महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरतील. आमच्यावर कितीही केसेस पडू द्यात आम्ही घाबरत नाही. आजही आमच्यावर अनेक केसेस आहेत. आम्ही कायदेशीर लढाई तर लढूच पण साहेबांना अटक झाली तर महाराष्ट्र सैनिक शांत बसणार नाही, असे म्हणत संदीप देशपांडे यांनी राज्य सरकारला एकप्रकारे इशाराच दिला आहे.

    १६ अटींपैकी १२ अटींचे उल्लंघन

    मिशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालिसा प्रकरणात आता पोलिसांनी तत्काळ कठोर भूमिका घेणार असल्याचे राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर संभाजीनगरात ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल कैला आहे. १ मे राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देण्यापूर्वीच पोलीस आयुक्तांनी सशर्त परवानगी दिली होती. ही सभा होण्यापूर्वी पोलिसांनी तब्बल १६ अटी घातल्या होत्या त्यापैकी १२ अटींचे उल्लंघन झाल्याचे पोलिसांना अढळून आले आहे. दरम्यान, पोलिसांच्या अटी किंवा नियमांचे पालन झाले नाही तर कारवाई करू, असा इशारा देखील देण्यात आला होता.

    Thackeray warns Pawar government to take to the streets mns

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    Maharashtra : राज्यातील कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करुन महाराष्ट्र कामगार संहिता नियम तयार होणार!

    Savitribai Phule memorial नायगावात सावित्रीबाई फुले स्मारकासाठी 142.60 कोटी रुपये मंजूर; फडणवीस सरकारचा निर्णय!!

    त्यावेळी राज की उद्धव?, प्रश्नावर पवारांचे उत्तर “ठाकरे कुटुंबीय”; पण आता दोन्ही भावांच्या ऐक्यावर मात्र कानावर हात!!