वृत्तसंस्था
मुंबई : नाशिक येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, त्यांचे पुत्र, माजी खासदार समीर भुजबळ आणि माजी आमदार पंकज भुजबळ यांची १०० कोटींची बेनामी मालमत्ता प्राप्तिकर विभागाने जप्त केली आहे. याबाबतची माहिती भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली. Thackeray Sarkar’s Minister Chhagan Bhujbal, Ex MP Samir Bhujbal Ex MLA Pankaj Bhujbal’s ₹100 crore BENAMI Properties Siezed by Income Tax
- छगन भुजबळ यांच्या मनी लॉन्ड्रिंग केसशी संबंधित “अल जबरिया कोर्ट” मालमत्ता जप्त; आयकर खात्याची कारवाई
भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले, काल याबाबतचे पत्रक प्राप्तिकर विभागाने पोस्ट केले आहे. छगन भुजबळ, समीर भुजबळ , पंकज भुजबळ यांची १०० कोटींची बेनामी मालमत्ता आयकर विभागाने जप्त केल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी व्हिडिओत केला आहे. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान ,या प्रकरणात डायरेक्टर प्राप्तिकर विभागाच्या मार्फ़त सेशन कोर्ट मुंबई येथे दावा दाखल केला असून कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती मिळत आहे. भाजप नेते किरीट सोमय्या, आणि माहिती अधिकार कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती.
Thackeray Sarkar’s Minister Chhagan Bhujbal, Ex MP Samir Bhujbal Ex MLA Pankaj Bhujbal’s ₹100 crore BENAMI Properties Siezed by Income Tax
महत्त्वाच्या बातम्या
- मेंदूचा शोध व बोध : पालकांना विचारलेल्या प्रश्नांतूनच होते मुलांच्या मेंदूची खरी मशागत
- विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : जपानच्या टोयोटा ट्रान्सपोर्टची कार धावणार चक्क सौर ऊर्जेवर
- वैभव नाईक म्हणाले,कायदा काय असतो हे नारायण राणेंना कळून चुकले
- नारायण राणेंना जामीन मिळाला तरी त्यांना कायद्याच्या जंजाळात अडकविण्याचा प्रयत्न; २ सप्टेंबरला हजर राहण्याची नाशिक पोलीसांची नोटीस