• Download App
    राज्यपालांचा बळीचा बकरा, पृथ्वीराज चव्हाण यांना अध्यक्ष बनवायचे नसल्याने गुप्त मतदानाला ठाकरे- पवार यांचा विरोध ; किरीट सोमय्या यांची टीका । Thackeray-Pawar's opposition to secret ballot, does not want to be made president to Prithviraj Chavan ; the scapegoat of the governor, ; Criticism of Kirit Somaiya

    राज्यपालांचा बळीचा बकरा, पृथ्वीराज चव्हाण यांना अध्यक्ष बनवायचे नसल्याने गुप्त मतदानाला ठाकरे- पवार यांचा विरोध ; किरीट सोमय्या यांची टीका

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून एकीकडे राज्यपालांना बळीचा बकरा बनविला असून दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण यांना अध्यक्ष बनवायचे नव्हते. त्यामुळे गुप्त मतदानाला विरोध करण्याचे कारस्थान उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी रचले, अशी टीका भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली. Thackeray-Pawar’s opposition to secret ballot, does not want to be made president to Prithviraj Chavan ; the scapegoat of the governor, ; Criticism of Kirit Somaiya

    महाविकास आघाडीकडे १७० आमदार आहेत तर भाजपकडे १०५ आमदार आहेत. त्यामुळे गुप्त मतदान पद्धतीने का मतदान केले नाही. तसे करून पृथ्वीराज चव्हाण यांना अध्यक्ष करता आले असते. मग का नाही केले मतदान, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला. तसेच राज्यपालांना बळीचा बकरा बनवण्याचं काम शरद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले.



    शरद पवार आणि मुख्यमंत्री यांनी सहा वाजेपर्यंत उत्तर द्या नाहीतर आम्ही विधानसभेत काय तो निर्णय घेऊ, अशी धमकी दिली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे सरकार हे उद्धट सरकार असल्याप्रमाणे कसे काय वागू शकते. महाराष्ट्राची जनता हे आता सहन करणार नाही. विधानसभा अध्यक्षपदाच्या मुद्यावरून राहुल गांधींना सुद्धा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मूर्ख बनवले आहे. शरद पवार आणि मुख्यमंत्री यांचा हा कट होता. अध्यक्ष निवड मुद्याशी राज्यपालांचा संबंध नाहीच. महाराष्ट्रातील साडे बारा कोटी लोकांना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची घटना पायदळी तुडविल्याचे दुःख होतंय. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे माफिया सरकार अशा प्रकारे राज्यपालांना धमकी देतात , ही बाब जनता सहन करणार नाही, असे सोमय्या म्हणाले.

    Thackeray-Pawar’s opposition to secret ballot, does not want to be made president to Prithviraj Chavan ; the scapegoat of the governor, ; Criticism of Kirit Somaiya

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कोल्हापूरची लढाई शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक न ठेवता मोदी विरुद्ध राहुल गांधी करण्यात महायुती यशस्वी!!

    लोकसभेत धडाडणार भाजपकडून कायद्याची तोफ; उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकमांना उमेदवारी!!

    लोकसभेला फिस्कटले तरी प्रकाश आंबेडकरांचा विधानसभेसाठी आघाडीचा काँग्रेसला नवा प्रस्ताव!!