विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांचे आमदार पात्रच ठरवले मात्र या निकालावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी जुनाच सूर लावत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या भेटीवर पुन्हा तोच आसूड ओढला.Thackeray – pawar targets assembly speaker rahul narvekar again in the same way, they targeted his meeting with CM eknath shinde!!
गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतिक्षेत असलेला आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल स्पष्ट झालेला आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला. यामध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना हाच खरा पक्ष असल्याचे स्पष्ट केले. शिंदे गटाच्या 16 आमदारांना पात्र ठरवत ठाकरे गटाच्या 14 आमदारांनाही पात्र ठरवले. राहुल नार्वेकर यांच्या या निर्णयाचा उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला.
त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी एकाच सुरात राहुल नार्वेकर आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर पुन्हा आक्षेप घेणारे आसूड ओढले. शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. त्या सल्ल्या आधीच उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात गेले आहेत आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात अवमान याचिका दाखल करता येईल का??, याचा ते विचार करत आहेत.
काय म्हणाले शरद पवार?
सत्ताधाऱ्यांना निकालाबाबत आधीच माहिती होती. त्यांनी आधीच यावर भाष्य केले होते. उद्धव ठाकरेंना आता सर्वोच्च न्यायालयात जावे लागेल. अध्यक्षांनी विधिमंडळ पक्षाला महत्व दिले. सर्वोच्च न्यायालयाची गाईडलाईन डावलण्यात आल्या. सत्ताधाऱ्यांना निकालाची खात्री होती. व्हिप देण्याचा निर्णय हा पक्षसंघटनेचा असतो. हा राजकीय न्याय निवाडा आहे, असं शरद पवार यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरेंनी देखील राहुल नार्वेकर यांच्यावर तोच आक्षेप घेतला राहुल टाकत राहुल नार्वेकर आरोपीला म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटायला गेले होते तेव्हाच त्यांची मॅच फिक्सिंग झाली होती त्यामुळे आजचा निकाल आम्हाला अनपेक्षित नाही या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जायचा पर्याय खुला आहे तो आम्ही स्वीकारतोच आहोत त्याचबरोबर जनतेच्या न्यायालयात जाण्याचा पर्यायही खुला आहे आम्ही तेथेही जाऊ कारण जनता मिंधे गटाला कधीच खरी शिवसेना म्हणून मान्यता देणार नाही असे उद्धव ठाकरे म्हणाले.
निवडणुका जवळ असल्याने सत्तेचा कसा वापर होतो, याची प्रचिती आज आली. सर्वोच्च न्यायालयात ठाकरेंना न्याय मिळेल, असंही शरद पवारांनी यावेळी म्हटलं आहे. उद्धव ठाकरेंना सर्वोच्च न्यायालयात जावं लागेलं. अध्यक्षांच्या या निकालामुळे सर्वोच्च न्यायालयात उद्धव ठाकरेंना मदत होईल, असंही पवारांनी म्हटलं आहे.
दरम्यान, घराणेशाही मोडीत निघाली. विधानसभा सदस्यांना मनमानीविरुद्द आवाज उठवण्याचा अधिकार आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आदित्य ठाकरे यांना यावर व्यक्त होताना निर्लज्ज म्हणत संताप व्यक्त केला आहे. लोकशाहीची इतकी निर्लज्ज हत्या यापेक्षा ठरु शकत नाही. हे देशासाठी मोठे संकेत आहे. घाणेरडे, खोक्याचं राजकारण वैध ठरवले जात आहे. भाजपाला देशाचे संविधान बदलायचे आहे, असं आदित्य म्हणाले.
Thackeray – pawar targets assembly speaker rahul narvekar again in the same way, they targeted his meeting with CM eknath shinde!!
महत्वाच्या बातम्या
- मालदीवचे टुरिझम मार्केट आता तुम्हीच सुधारा; चीन धार्जिण्या अध्यक्षांनी टाकली चीनवरच जबाबदारी!!
- शाजापूरमध्ये अक्षत कलश यात्रेवर हल्लेखोरांची दगडफेक, परिसरात कलम 144 लागू
- खर्गे, ममता, पवारांची वक्तव्ये Off track; सौदी अरब अध्यक्षांसह मोदी On the Ram track!!
- भयानक : चार वर्षीय चिमुकल्याचा मृतदेह बॅगेत घेऊन जाणाऱ्या स्टार्ट अपच्या CEOला बंगळुरुमध्ये अटक