• Download App
    ठाकरे- पवार सरकारचे विसर्जन करणारच ;  किरीट सोमय्या यांचा खणखणीत इशारा; घोटाळे बाहेर काढणारच । Thackeray-Pawar government will be Immersion : kirit somyaa

    ठाकरे- पवार सरकारचे विसर्जन करणारच ;  किरीट सोमय्या यांचा खणखणीत इशारा; घोटाळे बाहेर काढणारच

    विशेष प्रतिनिधी

    पंढरपूर : राज्यातील घोटाळेबाज ठाकरे- पवार सरकारचे विसर्जन करणारच आहे, असा खणखणीत इशारा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पंढरपुरमध्ये दिला आहे. Thackeray-Pawar government will be Immersion : kirit somyaa

    ते म्हणाले, घोटाळेबाज हसन मुश्रीफ मोकाट आणि मल जेलमध्ये आम्हाला पाठवता का ? कोल्हापूर दौऱ्यावर जाताना मला अडवण्याचा प्रयत्न केला. घोटाळेबाजांची आता सुटी नाही. मंत्र्यांच्या जेल वाऱ्या सुरु झाल्या आहेत. जितेंद्र आव्हाड जेलमध्ये जाऊन आले. आता परिवहन मंत्री अनिल परब यांचा नंबर आहे. अनिल देशमुख यांनी कपड्याची ब्याग भरून ठेवावी. लवकर प्रकट व्हावे.



    उद्धव ठाकरे अलिबाबा आणि ४० चोरांचे सरकार असल्याचे डिसेंबर अखेर उघड होईल. पुणे जिल्ह्यात लोक म्हणतात ‘ सब जमीन पवार की’ , घोटाळेबाजाचे बारावे मी घालणार आहे. कोणालाही मी तसा सोडणार नाही, असा खणखणीत इशारा त्यांनी दिला.

    • घोटाळेबाज ठाकरे सरकारचे विसर्जन करणारच
    • आता मंत्र्यांच्या जेलच्या वाऱ्या सुरु होणार
    • जितेंद्र आव्हाड नुकतेच जेलमध्ये जाऊन आले
    • आता अनिल देशमुख यांनी कपडे भरावेत
    • मग परिवहन मंत्री अनिल परब यांचा नंबर आहे
    • डिसेंबरअखेर उद्धव ठाकरे अलिबाबा आणि ४० चोर
    • पुणे जिल्ह्यात लोक बोलतात ‘सब भूमी पवार की’
    • घोटाळेबाजांचा बारावा मी करणारच आहे

    Thackeray-Pawar government will be Immersion : kirit somyaa

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Pune Toxic : पुणे विषारी दारूकांडात मृतांचा आकडा १५ वर; मुख्य आरोपीसह ८ जण अटकेत, फडणवीसांचे कठोर कारवाईचे आदेश

    Chhagan Bhujbal : ‘आमच्यात कोणताही वाद नाही’; महायुतीतील जागावाटपावरून सुरू चर्चांदरम्यान भुजबळ-तटकरे एकत्र

    Manoj Jarange Patil : मराठा आंदोलन पुन्हा पेटणार; मनोज जरांगे-पाटील उद्यापासून उपोषणावर, सरकारचे शिष्टमंडळ भेटीस