• Download App
    पूराची बातमी महाराष्ट्रभर; ठाकरे – फडणवीस भेटीची बातमी देशभर; मुख्यमंत्र्यांच्या निरोपानंतर झाली भेट; प्रवीण दरेकरांची माहिती|Thackeray - News of Fadnavis meeting across the country; The meeting took place after the Chief Minister's message; Information of Praveen Darekar

    पूराची बातमी महाराष्ट्रभर : ठाकरे – फडणवीस भेटीची बातमी देशभर; मुख्यमंत्र्यांच्या निरोपानंतर झाली भेट; प्रवीण दरेकरांची माहिती

    प्रतिनिधी

    कोल्हापूर – कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रात आलेल्या पूराची राज्यभर चर्चा सुरू असताना एका भेटीमुळे महाराष्ट्रातल्या पूराची चर्चा देशभर गेली आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट.Thackeray – News of Fadnavis meeting across the country; The meeting took place after the Chief Minister’s message; Information of Praveen Darekar

    कोल्हापूरच्या शाहुपुरीत पूरग्रस्तांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा निरोप आला की तुम्ही तिथेच थांबलात तर आम्ही तिथे येतो आपली भेट होईल. त्यानुसार देवेंद्र फडणवीस तेथे थोडा वेळ थांबले. मुख्यमंत्री आले आणि दोन्ही नेत्यांची भेट झाली. त्याची बातमी राज्यभर न राहता देशभर झाली.



    या भेटीबाबत विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस हे मागील काही दिवसांपासून कोकणासह पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. पूरग्रस्त जनतेमध्ये संतप्त भावना दिसून येत आहेत.

    आम्ही शाहुपुरीत पाहणी करीत असताना दरम्यान, मुख्यमंत्र्यांचा निरोप आला की आम्ही येत आहोत, तुम्ही थांबलात तर बरे होईल. मुख्यमंत्र्याचा अशाप्रकारचा निरोप आल्याने आम्ही थांबलो आणि ठाकरे – फडणवीस यांची ही भेट झाली.

     

    यावेळी परिस्थितीतून तातडीने मार्ग काढावा लागेल, अशी भूमिका फडणवीसांनी मांडली. या ठिकाणी दीर्घकालीन उपाययोजना कराव्या लागतील, असे फडणवीस म्हणाले असल्याची माहिती प्रणीण दरेकर यांनी पत्रकारांना दिली.

    “शाहूपुरी भागात दौऱ्यावर असताना अनेक नागरिकांशी संवाद साधला. या भागात नागरिकांशी संवाद साधत असतानाच मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी हे सुद्धा तेथे आले असता पूरग्रस्तांच्या व्यथा त्यांना सांगितल्या आणि पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याची विनंती केली,

    तसेच या समस्येवर दीर्घकालीन उपाययोजना शोधण्याची सुद्धा गरज असल्याने एक बैठक तातडीने बोलवावी, अशी मागणी सुद्धा केली. आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे यावेळी उपस्थित होते,” असे ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी केले.

    Thackeray – News of Fadnavis meeting across the country; The meeting took place after the Chief Minister’s message; Information of Praveen Darekar

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!