प्रतिनिधी
मुंबई : विधिमंडळ नव्हे, चोरमंडळ असे म्हणणाऱ्या संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर विरोधी पक्षांना उशिराचे शहाणपण सुचले आहे. विशेषतः ठाकरे गटाला चार दिवसांनी जाग आली आहे. संजय राऊतांवर कारवाई करीत असाल, तर एकनाथ शिंदेंवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांच्या एका जुन्या वक्तव्याचा आधार घेत विधान परिषदेच्या सभापतींना पत्र लिहिले आहे.Thackeray faction wakes up after 4 days after impeachment motion against Sanjay Raut; Violation of rights in the Legislative Council against the Chief Minister
राज्यसभा खासदार संजय राऊतांनी बुधवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना, ‘राज्यात विधिमंडळ नाही, तर चोरमंडळ आहे’, अशी टीका केली होती. राऊतांच्या या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. याविरोधात शिवसेना-भाजपाने आक्रमक भूमिका घेत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत हक्कभंग सूचना दाखल केली. विधानसभेत आमदार अतुल भातखळकर आणि विधानपरिषदेत आमदार राम शिंदे यांनी अनुक्रमे अध्यक्ष आणि सभापतींना यासंदर्भातील पत्र दिले आहे.
यानंतर संजय राऊतांवर कारवाई होण्याचे संकेत मिळू लागल्याने विरोधी पक्षांनी विशेषतः उद्धवसेनेने मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी त्यांच्या एका जुन्या वक्तव्याचा आधार घेत हक्कभंग दाखल करण्याची मागणी विधानपरिषदेच्या सभापतींकडे करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तसे पत्र सभापतींना पाठवले आहे.
प्रतिनिधी
मुंबई : विधिमंडळ नव्हे, चोरमंडळ असे म्हणणाऱ्या संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल झाल्यानंतर विरोधी पक्षांना उशिराचे शहाणपण सुचले आहे. विशेषतः ठाकरे गटाला चार दिवसांनी जाग आली आहे. संजय राऊतांवर कारवाई करीत असाल, तर एकनाथ शिंदेंवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांच्या एका जुन्या वक्तव्याचा आधार घेत विधान परिषदेच्या सभापतींना पत्र लिहिले आहे.
राज्यसभा खासदार संजय राऊतांनी बुधवारी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना, ‘राज्यात विधिमंडळ नाही, तर चोरमंडळ आहे’, अशी टीका केली होती. राऊतांच्या या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले. याविरोधात शिवसेना-भाजपाने आक्रमक भूमिका घेत विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत हक्कभंग सूचना दाखल केली. विधानसभेत आमदार अतुल भातखळकर आणि विधानपरिषदेत आमदार राम शिंदे यांनी अनुक्रमे अध्यक्ष आणि सभापतींना यासंदर्भातील पत्र दिले आहे.
यानंतर संजय राऊतांवर कारवाई होण्याचे संकेत मिळू लागल्याने विरोधी पक्षांनी विशेषतः उद्धवसेनेने मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी त्यांच्या एका जुन्या वक्तव्याचा आधार घेत हक्कभंग दाखल करण्याची मागणी विधानपरिषदेच्या सभापतींकडे करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तसे पत्र सभापतींना पाठवले आहे.
अंबादास दानवे यांचे पत्र
मी महाराष्ट्र विधानपरिषद नियम २४१ अन्वये महानगर मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्यविरुद खालीलप्रमाणे विशेषाधिकारभंगाची सूचना देत आहे.
रविवार, दिनांक २६ फेब्रुवारी, २०२३ रोजी शासनाने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमास विरोधी पक्षांनी शेतकरी विद्यार्थ्यांचे प्रश्न, कायदा व सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा या विषयावरून बहिष्कार घातला होता.
तदनुषंगाने मा. मुख्यमंत्री महोदयांनी पत्रकार परिषदेत आपण देशद्रोह्यांबरोबर चहापान टाळले, असे वक्तव्य केले आहे. राज्याच्या प्रमुख पदी असलेल्या लोकप्रतिनिधींनी अशा हीन भाषेचा वापर कल्यामुळे विरोधी पक्ष नेता महाराष्ट्र विधानपरिषद म्हणून माझा आणि सार्वभौम सभागृहाचा विशेषाधिकार भंग आणि अवमान झाला आहे. हे प्रकरण गंभीर आहे. त्यामुळे मा. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचे विरुद्ध मी हक्कभंगाचा प्रस्ताव देत आहे. कृपया हा प्रस्ताव स्वीकृत करून पुढील चौकशी व कार्यवाहीसाठी विधान परिषद विशेष हक्कभंग समितीकडे पाठवावे, अशी आपणांस विनंती आहे.
विधान परिषदेला सध्या सभापती नाही. त्यामुळे सध्या उपसभापती नीलम गोऱ्हे याच विधान परिषदेचे कामकाज चालवतात. अंबादास दानवे यांनी दिलेल्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधातल्या हक्कभंग प्रस्तावावर त्या काय निर्णय घेतात?, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

Thackeray faction wakes up after 4 days after impeachment motion against Sanjay Raut; Violation of rights in the Legislative Council against the Chief Minister
महत्वाच्या बातम्या
- ज्यांना आपला इतिहास माहिती नसतो त्यांना वर्तमान तर असतं परंतु भविष्य नसतं – देवेंद्र फडणवीस
- आम्ही गद्दारी केली असती तर खासदार तरी झाला असतात का??; उदय सामंतांचे संजय राऊतांच्या वर्मावर बोट
- CPR सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चचे फॉरेन फंडिंग लायसन्स निलंबित!!; कोणाचे आहे सेंटर??, का केली कारवाई??
- “उद्धव ठाकरे हे सुद्धा या विधिमंडळाचे सदस्य आहेत, मग संजय राऊत त्यांनाही चोर ठरवणार आहेत का?” फडणवीसांचा थेट सवाल!