महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यात दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या ७ हजार ८०० उमेदवारांकडून पैसे उकळल्याचे प्रकरण समोर आले आहे. सायबर पोलिसांच्या तपासात ही बाब समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2019-20 मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत उत्तीर्ण घोषित झालेल्या 16 हजार 592 उमेदवारांपैकी 7,800 उमेदवार अनुत्तीर्ण झाल्याचे तपासणीत आढळून आले आहे. नापास विद्यार्थी पैशांची देवाणघेवाण करून उत्तीर्ण झाल्याच्या वृत्ताने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.TET Exam Scam Big scam in Maharashtra Teacher Eligibility Test, 7 thousand 800 failed students passed by paying
वृत्तसंस्था
पुणे : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळ्यात दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या ७ हजार ८०० उमेदवारांकडून पैसे उकळल्याचे प्रकरण समोर आले आहे. सायबर पोलिसांच्या तपासात ही बाब समोर आली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने 2019-20 मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत उत्तीर्ण घोषित झालेल्या 16 हजार 592 उमेदवारांपैकी 7,800 उमेदवार अनुत्तीर्ण झाल्याचे तपासणीत आढळून आले आहे. नापास विद्यार्थी पैशांची देवाणघेवाण करून उत्तीर्ण झाल्याच्या वृत्ताने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
2018 मध्ये झालेल्या परीक्षेतही अनुत्तीर्ण उमेदवारांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळल्याच्या आरोपांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाच्या तपासासंदर्भात पुणे सायबर पोलीस राज्य परीक्षा परिषदेने दिलेल्या माहितीची आणि परीक्षेच्या निकालाची कसून चौकशी करत आहेत. याच तपासादरम्यान सायबर पोलिसांना 2019-20 च्या परीक्षेच्या निकालाबाबतही घोटाळा झाल्याचे समोर आले.
पुणे सायबर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2019-20 च्या परीक्षेत एकूण 16 हजार 592 उमेदवार उत्तीर्ण झाले होते, मात्र परीक्षेच्या निकालाची सखोल छाननी केली असता सुमारे 7 हजार 800 उमेदवार उत्तीर्ण झाले नसल्याचे दिसून आले. पण त्यांना उत्तीर्ण दाखवण्यात आले.
पुणे सायबर पोलिस २०१८ आणि २०२० च्या टीईटी घोटाळ्याचा तपास करत आहेत. शिक्षण परिषदेने आता 2013 पासूनच टीईटीद्वारे होणाऱ्या भरतीतील शिक्षकांची प्रमाणपत्रे योग्य आहेत की नाही, हे तपासावे, असा निर्णय घेतला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश राज्यातील सर्व जिल्हा परिषदांना, महापालिकांच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या शाळांना देण्यात आले आहेत. पुणे सायबर पोलिस सध्या 2018 आणि 2020 मधील TET घोटाळ्याचा तपास करत आहेत.
मागच्या परीक्षांचेही निकाल तपासण्याचे आदेश
2013 पासून या भरती परीक्षेत घोटाळे होत असल्याचा आरोप होत आहे. यासाठी गेल्या आठ वर्षांतील निकाल आणि प्रमाणपत्रे तपासण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या पंधरा दिवसांत राज्यातील साडेपाच हजार शिक्षकांनी आपली प्रमाणपत्रे महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडे पाठवली आहेत.
हा घोटाळा समोर येताच विशेषत: राज्य परीक्षांची तयारी करणाऱ्या होतकरू उमेदवारांना धक्का बसला आहे. रात्रंदिवस गांभीर्याने परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि पैसे न दिल्यामुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या यादीत नाव न आलेल्या अशा हजारो पात्र उमेदवारांच्या भवितव्याशी या घोटाळेबाजांनी हा खेळ खेळल्याचे बोलले जात आहे.
TET Exam Scam Big scam in Maharashtra Teacher Eligibility Test, 7 thousand 800 failed students passed by paying
महत्त्वाच्या बातम्या
- Budget 2022 : अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी काँग्रेसची महत्त्वाची बैठक, ‘या’ मुद्द्यांवरून मोदी सरकारला घेरण्याची रणनीती
- ऐतिहासिक : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाला लवकरच मिळणार पहिली कृष्णवर्णीय महिला न्यायाधीश, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची घोषणा
- Tipu Sultan Controversy : प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप – सत्तेत येण्यासाठी भाजपकडून हिंदू-मुस्लिम वाद भडकवण्याचा प्रयत्न
- NCC Event : पंतप्रधान मोदींकडून NCC दलाच्या मार्चपास्टचे निरीक्षण, करिअप्पा मैदानावर गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला