• Download App
    Elevated Corridor नाशिक फाटा ते खेड ८ पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदा प्रक्रियेला गती!!

    नाशिक फाटा ते खेड ८ पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉरच्या निविदा प्रक्रियेला गती!!

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक : नाशिक फाटा ते खेड ८ पदरी एलिव्हेटेड कॉरिडॉर प्रकल्पाने अखेर निर्णायक टप्पा गाठला असून, हा पिंपरी-चिंचवड आणि खेड परिसरासाठी हा ऐतिहासिक क्षण आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गावरील वाहतूक कोंडी, अपघात आणि नागरिकांचा होत असलेला वेळेचा व इंधनाचा अपव्यय लक्षात घेऊन नाशिकफाटा ते खेड महामार्ग रस्ता रुंदीकरण तथा एलीव्हेटेड कॉरिडॉर हा महत्वाकांशी प्रकल्प संकल्पित झाला.

    या प्रकल्पासाठी देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सातत्याने याबाबत पाठपुरावा केला त्याचेच यश म्हणजे आता या कामाच्या निविदा प्रक्रियेला गती मिळाली असून तीन नामांकित कंपन्यांनी या कामासाठी निविदा दाखल केल्या आहेत.



    – ₹७,८२७ कोटींची घोषणा

    केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री श्री नितीन गडकरी यांनी या प्रकल्पासाठी तब्बल ₹७,८२७ कोटीची घोषणा केली होती. त्यामुळे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आता गती मिळाली आहे. वेळोवेळी ठोस भूमिका मांडत, भू-संपादनातील अडचणी, निधी आणि स्थानिक नागरिक व उद्योगांच्या प्रश्नांना प्राधान्य देत साकारत असलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प अखेर निर्णायक टप्प्यात आला आहे.

    हा एलिव्हेटेड कॉरिडॉर पूर्ण झाल्यानंतर भोसरी, चाकण, पिंपरी-चिंचवड आणि खेड औद्योगिक पट्ट्यांना वेगवान आणि सुरक्षित कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. उद्योग, कामगार, व्यापारी तसेच सर्वसामान्य नागरिकांसाठी हा प्रकल्प मोठा दिलासा देणारा ठरेल.

    पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वात आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याबाबत आम्ही सर्वतोपरी पाठपुरावा करणार आहोत, असे भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.

    Tender Process for Nashik Phata–Khed 8-Lane Elevated Corridor Gains Momentum!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Bachchu Kadu : ऑपरेशन टायगरनंतर पुढचा डाव; ‘खासदारांनंतर आता आमदारही येतील’, बच्चू कडूंचा दावा, उद्याच्या कार्यक्रमात 6 बंडखोर खासदार गैरहजर राहणार?

    Sanjay Raut : ‘ऑपरेशन टायगर’वर ठाकरे गटाचा प्रतिहल्ला; आता ‘ऑपरेशन तुडवा’ सुरू करणार, संजय राऊतांचा इशारा

    Eknath Shinde : सहा खासदारांच्या बंडानंतर शिंदेंची ताकद वाढली; महाराष्ट्राच्या राजकारणात ‘नवा पॉवर सेंटर’ उदयास?