विशेष प्रतिनिधी
मुंबई – १९९१ ते २०१८ दरम्यान मुंबईने ८१ टक्के मोकळ्या जागा, ४० टक्के हरित आच्छादन आणि सुमारे ३० टक्के जल क्षेत्र गमावले आहे. त्यामुळे या २७ वर्षांतच मुंबईच्या तापमानात सरासरी दोन अंश सेल्सिअसने वाढ झाल्याची चिंताजनक बाब एका संशोधनातून समोर आली आहे.Temp. in Mumbai incresed
हा अभ्यास ‘इंडियन रिमोट सेन्सिंग जर्नल’ मध्ये प्रकाशित झाला आहे. नवी दिल्ली येथील जमिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, हैदराबादेतील उस्मानिया विद्यापीठ आणि अलिगड मुस्लिम विद्यापीठ येथील संशोधकांनी हे निष्कर्ष मांडले आहेत.
यासाठी संशोधकांनी उपग्रहावर आधारित प्रतिमांचा वापर करत मुंबई शहर आणि उपगनरांतील एकूण ६०३ चौरस कि.मी. प्रदेशाचा अभ्यास केला.अहवालानुसार, मुंबईच्या तापमानवाढीस केवळ हवामान बदल कारणीभूत नाही; तर यासाठी जमीन वापराच्या पद्धतीत झालेला बदलही तेवढाच महत्त्वाचा ठरला आहे.
१९९१ ते २०१८ या काळात मुंबईतील बांधकाम क्षेत्रफळात ६६ टक्क्यांनी वाढ झाली. बांधकामामध्ये वापरली जाणारी काँक्रीटसारखी साधनसामग्री हे तापमानवाढीस सर्वांत प्रमुख कारण असल्याचे यात म्हटले आहे.
Temp. in Mumbai incresed
महत्त्वाच्या बातम्या
- UP Election 2022 : प्रियांका गांधींची मोठी घोषणा, उत्तर प्रदेशात सत्ता आल्यास मुलींना देणार स्मार्टफोन आणि स्कूटी
- पाकिस्तानात वाढत्या महागाईमुळे विरोधक उतरले रस्त्यावर, जुलमी इम्रान सरकारपासून सुटका मिळण्याची मागणी
- सर्वोच्च न्यायालयाचे CJI रमण्णा यांनी कायदामंत्र्यांसमोरच पायाभूत सुविधांवर केला सवाल, म्हणाले – ‘न्यायालयांसाठी उत्तम पायाभूत सुविधा ही फक्त एक कल्पना!’
- महागाईचा परिणाम : 14 वर्षांनंतर वाढणारे आगपेटीचे दर, एका झटक्यात दुप्पट होणार किंमत