विशेष प्रतिनिधी
मुंबई :Chhagan Bhujbal तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यातील तेल्लापूर गावात क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचे तीव्र पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला असून थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “महात्मा फुलेंचा अपमान हा देश कदापि सहन करणार नाही,’ अशा शब्दांत भुजबळ यांनी इशारा दिला आहे.Chhagan Bhujbal
७ फेब्रुवारी २०२६ रोजी भरदिवसा तेलंगणातील तेल्लापूर येथे समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या पुतळ्यावर समाजकंटकांकडून हल्ला करण्यात आला. ही घटना केवळ एका पुतळ्याची विटंबना नसून सामाजिक समता आणि मानवतावादी विचारांवर झालेला हा मोठा आघात असल्याची भावना पत्राद्वारे व्यक्त करण्यात आली आहे. छगन भुजबळ यांनी आपल्या पत्रात महात्मा फुलेंच्या कार्याचा गौरव करत म्हटले आहे की, “ज्या महापुरुषाने देशातील पहिली मुलींची शाळा काढली आणि सती प्रथा, बालविवाह यांसारख्या अनिष्ट प्रथांविरुद्ध लढा दिला, त्यांच्या पुतळ्यावर होणारा हल्ला हा समाजातील वैमनस्य वाढवणारा आहे. दरम्यान, या घटनेतील दोषींना तत्काळ अटक करण्याची मागणी महाराष्ट्रातून होत आहे.Chhagan Bhujbal
अॅड. प्रकाश आंबेडकरांनी संताप करत या घटनेमागे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा हात असल्याचा आरोप केलाय. “हा केवळ महात्मा जोतिबा फुले यांच्यावर झालेला हल्ला नसून दलित, आदिवासी आणि ओबीसी समाजावर झालेला हल्ला आहे. संघाला महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेचा तिरस्कार वाटतो, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
महात्मा फुले हे केवळ महाराष्ट्राचे नाहीत तर देशाची अस्मिता : दानवे
शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. महात्मा फुले हे केवळ महाराष्ट्राचे नाहीत तर देशाची अस्मिता आहेत. ज्या राज्यामध्ये ही घटना घडली त्या सरकारने याची सखोल चौकशी करून गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या पाहिजेत, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली. या वेळी दानवे यांनी महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानाचाही संदर्भ देत ज्यांनी आधी फुलेंचा अपमान केला होता. त्यांच्यावरही वेळीच कारवाई व्हायला हवी होती, असेही म्हणाले. दरम्यान, तेलंगणातील या प्रकरणावरून आता केंद्रात आणि राज्यात राजकारण चांगलेच तापण्याची चिन्हे आहेत. छगन भुजबळ यांच्या पत्रावर केंद्रीय गृह मंत्रालय काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पोलिसांच्या उपस्थितीत घडला प्रकार
तेलंगणामध्ये समाजकंटकांनी महात्मा जोतिबा पुले यांच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळी पोलिस असताना काही समाजकंटकांनी हा प्रकार केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि कार्यकर्त्यांना पिटाळून लावले. पण या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. समाजकंटकांना अटक करण्याची आणि कठोर शासन करण्याची मागणी होत आहे. या सर्व घटनेवर राज्यातही संताप व्यक्त होत आहे. अनेक ठिकाणी निषेध आंदोलनही करण्यात आले.
Phule Statue Vandalized in Telangana: Chhagan Bhujbal Writes to Amit Shah
महत्वाच्या बातम्या
- Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना मोठा दिलासा! e-KYC पोर्टल पुन्हा सुरू, 31 मार्चपर्यंत दुरुस्तीची संधी
- पवार कुटुंबातील घडामोडी आणि राष्ट्रवादीतील घडामोडींपासून सुप्रिया सुळे “दूर”; वाढले “गूढ”!!
- West Bengal : सर्वोच्च न्यायालयात निवडणूक आयोगाने म्हटले- बंगालमध्ये SIR दरम्यान हिंसा, धमक्या मिळाल्या
- ॲडव्हांटेज विदर्भ 2026 मध्ये इंटरनॅशनल बिझनेस कॉन्क्लेव्हचे उद्घाटन; 22 देशांचे राजदूत, वाणिज्यदूतांची उपस्थिती