प्रतिनिधी
नवी दिल्ली : शरद पवार गटाने अजित पवार गटाच्या खासदारांवर अपात्रतेची टांगती तलवार ठेवताच अजित पवार गटाचे खासदारही आक्रमक झाले आणि त्यांनी सुप्रिया सुळे यांना उत्तरे द्यायला सुरुवात केली आहे. Targeting Supriya Sule by Tatkare
बारामतीत दादा – दादा – दादा करत ज्यांचे आयुष्य गेले. मग, अजित पवार यांच्याविरोधात अपात्रतेची याचिका दाखल करताना राजकीय विचार वेगळे असल्याचे सुचले, असा टोला अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सुप्रिया सुळे यांना हाणला.
अजित पवार गटाने खासदार श्रीनिवास पाटील यांच्याविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. यावरून सुप्रिया सुळेंनी अजित पवार गटावर टीका केली होती. याला सुनील तटकरेंनी प्रत्युत्तर दिले.
सुनील तटकरे म्हणाले :
सुप्रिया सुळे, मोहम्मद फैजल आणि श्रीनिवास पाटील या 3 लोकसभा खासदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. शरद पवारांविरुद्ध कुठलीही अपात्रतेची याचिका दाखल केली नाही. कारण, शरद पवार हे आमचे दैवत आहेत.
अजित पवारांनी गेली 30 वर्षे स्वतः खपून बारामती शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना उभी केली. दादा – दादा – दादा बोलत त्यांचे राजकीय आयुष्य गेले. पण आता अजित पवारांविरोधात याचिका दाखल करताना राजकीय विचार वेगळे असल्याचे त्यांना सुचले.
श्रीनिवास पाटलांबद्दल मला आदर आहे. पण, राजकीय लढाईत वयोमर्यादा हा विषय नाही. 83 वर्षांचे सतत बोलून किती केविलवाणी सहानभुती निर्माण करण्याचा प्रयत्न करणार आहात?” असा बोचरा सवाल सुनील तटकरेंनी सुप्रिया सुळेंना केला.
Targeting Supriya Sule by Tatkare
महत्वाच्या बातम्या
- PNB Scam : नीरव मोदीला कोर्टाचा आणखी एक झटका, ७१ कोटींची मालमत्ता विक्रीचे आदेश
- महाराष्ट्राच्या आरोग्य क्षेत्रासाठी मोठी बातमी; वैद्यकीय शिक्षणाच्या श्रेणीवर्धनासाठी 500 दशलक्ष डॉलर्सची मदत!!
- जम्मूमध्ये घातपाचा मोठा कट उधळला ; ‘LOC’जवळ ड्रोनद्वारे फेकलेली शस्त्र सुरक्षा दलांनी केली जप्त!
- अयोध्या – काशी – मथुरा; श्रीकृष्ण जन्मभूमी दर्शन घेऊन पंतप्रधान मोदींनी वाजविला पुढच्या कामाचा डंका!!