नाशिक : तमिळनाडूतील एका आमदाराच्या भाजपने सत्ता स्थापनेच्या खेळापासून स्वतःला अधिकृतपणे बाजूला सारले. तामिळनाडू मध्ये कोणीही सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न केला तरी भाजप त्यांच्या बाजूने उभा राहणार नाही, अशा आशयाचे पत्रक भाजपचे प्रदेशाध्यक्ष नयनार नागेंद्रन यांनी काढले.
काँग्रेसचा भाजप वर आरोप
तामिळनाडू त्रिशंकू विधानसभा आल्यानंतर केंद्रातले भाजप सरकारच राज्यपालांच्या मार्फत तामिळनाडूच्या राजकारणाची सूत्रे हलवत आहे, असा आरोप काँग्रेसचे खासदार मणिक्कम टागोर यांनी केला होता. मात्र तो आरोप भाजपने फेटाळून लावत तामिळनाडूतल्या सत्तेच्या खेळात भाजपची कोणतीही भूमिकाच नाही, असा दावा करणारे पत्रक काढले.
तमिळनाडू भाजपचा फक्त एक आमदार
तामिळनाडू विधानसभेच्या निवडणुकीत भाजपने फक्त 28 जागा लढविल्या होत्या. त्यापैकी भाजपचा फक्त एक आमदार निवडून आला. पण तामिळनाडूतल्या सत्तेच्या खेळात प्रत्येक आमदाराच्या पाठिंब्याला महत्त्व प्राप्त झाल्याने भाजपच्या एका आमदाराचे महत्त्व सुद्धा वाढले. त्यातच काँग्रेसने थलपती विजय याला पाठिंबा देऊन राजकीय आघाडी घ्यायचा डाव खेळला पण तो विजय आणि काँग्रेस यांच्या संघाशी आला. कारण राज्यपालांनी बहुमताच्या आकड्यावर बोट ठेवून विजयला सरकार स्थापन करायला निमंत्रण द्यायलाच नकार दिला. त्यामुळे काँग्रेसचा पाठिंबा घ्यायची घाई करून विजय ची राजकीय गोची झाली. विजयला 107 आमदार निवडून आणून सुद्धा राजकीय अनुभवाच्या अभावी सरकार स्थापन करता आले नाही.
केंद्राच्या आणि द्रविडी पक्षांच्या हातात सूत्रे
या पार्श्वभूमीवर तामिळनाडू सगळी राजकीय सूत्रे केंद्रातल्या भाजपच्या हातात आणि राज्यातल्या दोन द्रविडी पक्षांच्या हातात गेली. द्रविड मुन्नेत्र कळघम आणि अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या दोन पक्षांच्या एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली. पण ती चर्चा राजकीय हवेत फिरली तरी प्रत्यक्षात दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी ती चर्चा नाकारली. त्या उलट सत्तेसाठी खेचाखेच सुरू ठेवण्यात आणि ताणून धरण्यात धन्यता मानली. कारण दोन्हीकडे कसलेले अनुभवी खेळाडू असल्याने त्यांनी कुठलीच घाई केली नाही. सत्तेसाठी खेचाखेच सुरू केल्याचा डाव पुरता विस्कटल्याशिवाय द्रविड मुन्नेत्र कळघम आणि अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम या दोघांनीही स्वतःचे पत्ते उघड करायला नकार दिला.
राज्यपालांकरवी “डाव” टाकायचे पर्याय खुले
या पार्श्वभूमीवर एका आमदाराच्या भाजपने तामिळनाडूतल्या सत्तेच्या खेळापासून स्वतःला अधिकृतपणे दूर करायचा “डाव” टाकला. पण राज्यपालांमार्फत डाव खेळण्याचे सगळे पर्याय खुले ठेवले. त्यामुळे विजय मार्फत तामिळ राजकारणात “डाव” टाकायचे काँग्रेसचे मनसूबे उधळले.
Tamil Nadu BJP president Nainar Nagenthran- “BJP wholeheartedly accepts the election results
महत्वाच्या बातम्या
- Supreme Court : सुप्रीम कोर्टात न्यायाधीशांची संख्या वाढून 37 होईल; मंत्रिमंडळाची प्रस्तावाला मंजुरी, संसदेच्या पुढील अधिवेशनात विधेयक
- जंग जंग पछाडले, पद काही मिळेना; पण स्वतःच्या तोंडून महत्त्वाकांक्षा जाहीर करायची हौस काही फिटेना!!
- दीदी, आप हारी नही, म्हणून अखिलेश यादवांकडून ममतांचा हिरवी शाल घालून सत्कार; पुढच्या राजकारणाची चाहूल!!
- Supreme Court : सबरीमाला केस, सुप्रीम कोर्ट म्हणाले- वारंवार भूमिका बदलू शकत नाही; बोहरा समाजातील धार्मिक