• Download App
    स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अडविला गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचा ताफा, कृषि पंपास १० तास वीज देण्याची मागणी |Swabhimani activists block Minister of State for Home Affairs Satej Patil's demand for 10 hours power supply to agricultural pumps

    स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी अडविला गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांचा ताफा, कृषि पंपास १० तास वीज देण्याची मागणी

    विशेष प्रतिनिधी

    कोल्हापूर : कृषी पंपास दिवसा १० तास वीज द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी करत असलेल्या आंदोलनाकडे महाविकास आघाडीचे सरकार जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत आहेत. असा आरोप करत गृह राज्यमंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांना आज(रविवार) हातकंणगले येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकत्यार्नी काळे झेंडे दाखवत व त्यांचा वाहनांचा ताफा रोखत निदर्शने केली.Swabhimani activists block Minister of State for Home Affairs Satej Patil’s demand for 10 hours power supply to agricultural pumps

    कोल्हापूर महावितरणच्या कार्यालयासमोर वीज संबधी विविध या मागणीसाठी राजू शेट्टी २२ फेब्रुवारी पासून धरणे आंदोलन करीत आहेत. याशिवाय जिल्ह्यात धरणे आंदोलनाबरोबर, चक्का जाम, सरकारी कार्यालयात साप सोडणे यासारखे आंदोलनं केली गेली आहेत. तर आज कोल्हापूरचे पालकमंत्री पाटील यांना काळे झेंडे दाखवित गाड्यांचा ताफा अडवण्यात आला.



    सतेज पाटील यांनी तोंडावर गोड बोलत जाणीवपुर्वक आंदोलनाकडे दुर्लक्ष करून शासन स्तरावर कोणतेच प्रयत्न केले नाहीत, असा आरोप संघटनेचे जिल्हा अध्यक्ष वैभव कांबळे, धनाजी पाटील, संपत पवार, सुरेश शिर्के आदी संतप्त कार्यकर्त्यांनी केला आहे.

    माजी खासदार राजू शेट्टी आणि कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील शेतकºयांनी १० तास वीज मिळावी यासह अन्य मागण्यांसाठी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरु केलेल्या बेमुदत आंदोलनावर चर्चा करण्यासाठी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ,

    सबंधित सचिव व अधिकारी आणि माजी खासदार राजू शेट्टी व शेतकºयांचे शिष्टमंडळ यांची संयुक्त बैठक तत्काळ आयोजित करावी, अशी विनंती पालकमंत्री सतेज पाटील यांनी उजार्मंत्री नितीन राऊत यांच्याकडे आज पत्राद्वारे केली आहे.

    Swabhimani activists block Minister of State for Home Affairs Satej Patil’s demand for 10 hours power supply to agricultural pumps

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस