वृत्तसंस्था
नागपूर : काँग्रेसचे खासदार राहुल गांधीसह गोंधळी खासदारांना किमान वर्षभरासाठी निलंबित करावे, अशी मागणी केंद्रीय सामाजिक व न्याय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
Suspend MPs including Rahul Gandhi for a year ; Ramdas Athavale
राज्यसभेत झालेल्या धक्काबुक्कीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तसेच संसदेतील गोंधळाविषयी उलटसुटल प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर खासदार राहुल गांधी यांना एका वर्षासाठी संसदेतून निलंबित करण्यात यावे, अशी मागणी रामदास आठवले यांनी केली.
राज्यसभेतील प्रकार संसदेच्या इतिहासातील कलंकित घटना आहे. अधिवेशनादरम्यान सरकारने सभागृहात चर्चा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधकांनी गोंधळ घालून कामकाज बंद पाडले. राहुल गांधीही चुकीच्या पद्धतीने वागले आहेत. यासाठी त्यांना वर्षभरासाठी निलंबित केले पाहिजे, असे मत आठवले यांनी मांडले.
जे विरोधीपक्षाचे खासदार केवळ कामकाजाच्या वेळी सभागृहात येत होते. कामकाज बंद पाडत होते, त्या सर्वांना निलंबित केले पाहिजे, असेही आठवले म्हणाले.राहुल गांधी सतत आरएसएस आणि भाजपवर राज्य घटनेची पायमल्ली केल्याचा आरोप करतात. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्य घटनेवर मस्तक ठेवतात. राहुल गांधीच्या वक्तव्यामुळेच आज काँग्रेसची ही दुर्दशा झालीय, अशी टीका देखील त्यांनी केली.
Suspend MPs including Rahul Gandhi for a year ; Ramdas Athavale
महत्त्वाच्या बातम्या
- अर्थव्यवस्थेत सुधारणांचे संकेत : किरकोळ महागाई जुलैमध्ये ५.५९%, तीन महिन्यांतील सर्वात कमी; औद्योगिक उत्पादनही वाढले
- छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासाचे शिखर पुरूष; शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंच्या शताब्दी गौरव समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भावोद्गार
- Share Market : 55 हजारी झाले सेन्सेक्स, अर्थव्यवस्था मजबुतीच्या संकेतांमुळे गुंतवणूकदारांत उत्साह
- Mission Olympics; पदक विजेत्या सिंधू, लवलिना, नीरजचा पुढाकार; सरकारचा पाठिंबा; छोट्या गावांमधून “बडे” खेळाडू तयार करणार