प्रतिनिधी
सातारा : माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांना ईमेलच्या माध्यमातून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या संशयित अंकुश शंकरराव सवराते (रा. आलेगाव, ता. पूर्णा, जि. परभणी) यास अटक करून आज कराडच्या प्रथम वर्ग न्यायालयासमोर हजर करण्यात आले. पोलिसांनी तीन दिवस पोलिस कोठडीची मागणी केली होती. मात्र, संशयिताच्या वकिलांचा युक्तिवाद मान्य करून न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला.Suspect arrested for threatening former Chief Minister Prithviraj Chavan via email; Land approved by Karad court
आमदार पृथ्वीराज चव्हाण यांना शनिवारी रात्री पावणे एकच्या सुमारास ईमेलवरून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. रविवारी सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर कराड शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी माहिती, तंत्रज्ञान कायदा कलम 67, आयपीसी कलम 505, 506, 507 नुसार गुन्हा दाखल केला होता. पृथ्वीराज चव्हाण यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली.
पोलिसांनी रविवारी रात्रीच संशयिताला राजगड परिसरातून ताब्यात घेऊन अटक केली. सोमवारी कराड येथील प्रथमवर्ग न्यायाधीश एम. व्ही. भागवत यांच्यासमोर हजर करण्यात आले. संशयिताने ईमेल केलेली साधनसामग्री जप्त करायची आहे. धमकी देण्यामागील उद्देश तसेच कोणाच्या सांगण्यावरून धमकी दिली आहे का, याचा तपास करण्यासाठी तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनी केली होती.
पोलिसांनी या गुन्ह्यात माहिती तंत्रज्ञान कायदा कलम 67 आणि भारतीय दंड विधान संहिता कलम 505 ही कलमे लावली आहेत. परंतु, ही कलमे या गुन्ह्यात लागूच होत नाहीत. त्यामुळे आरोपीला पोलीस कोठडी न देता जामीन मंजूर करावा, अशी विनंती संशयिताचे वकील महादेव साळुंखे यांनी केली. त्यांचा युक्तिवाद मान्य करून न्यायाधीश एम. व्ही. भागवत यांनी आरोपीस जामीन मंजूर केला.
Suspect arrested for threatening former Chief Minister Prithviraj Chavan via email; Land approved by Karad court
महत्वाच्या बातम्या
- समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना! शहापूर येथे गर्डरसह क्रेन कोसळल्याने १५ कामगारांचा मृत्यू
- Lok Sabha Elections 2024 : पंतप्रधान मोदींनी ‘NDA’ खासदारांना लोकसभा निवडणुकीसाठी दिला कानमंत्र!
- 2015 मधले भाकीत 2023 मध्ये ठरले खरे; देशातले सर्वांत मोठे राजकीय हवामान तज्ञ आज मोदींबरोबर व्यासपीठावर!!
- Land For Job Scam प्रकरणात ‘ED’चा लालूंना दणका, सहा कोटींची मालमत्ता जप्त!