विशेष प्रतिनिधी
मुंबई : Raj Thackeray गत काही दिवसांपासून मराठी भाषेच्या मुद्यावरून राज्याचे राजकारण तापले आहे. सरकारने प्राथमिक शिक्षणात हिंदी भाषेची सक्ती करणारा जीआर मागे घेतला. पण त्यानंतर मनसे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या विरोधात 5 जुलै रोजी विजयी मेळावा आयोजित करण्याची घोषणा केली. यामुळे मुंबईतील वातावरण तापले असताना आता उद्योगपती सुशील केडिया यांनी राज ठाकरें ( Raj Thackeray ) सारख्या लोकांना नाटक करण्याची परवानगी मिळेत असेपर्यंत आपण मराठी शिकणार नसल्याचे वादग्रस्त विधान केले आहे. दरम्यान, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केडिया यांना या प्रकरणी योग्य ते उत्तर देण्याचा इशारा दिला आहे.Raj Thackeray
महायुती सरकारने पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला होता. पण या प्रकरणी वाद झाल्यानंतर त्यांनी हा निर्णय मागे घेतला. पण आता या वादाने मराठी विरुद्ध अमराठी असे रूप घेतले आहे. त्यातच मुंबईत मनसेच्या कार्यकर्त्यांनी एका अमराठी दुकानदाराला केलेली मारहाण व त्यानंतर व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चामुळे स्थिती अधिकच चिघळली आहे. या पार्श्वभूमीवर केडियोनोमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना उपरोक्त आव्हान दिले आहे.
काय म्हणाले सुशील केडिया?
मागील 30 वर्षे मी मुंबईत राहिलो. त्यानंतरही मला मराठी भाषा फारशी कळत नाही. तसेच तुम्ही ज्या प्रकारे गैरवर्तन करत आहात, ते पाहता तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचे नाटक करण्याची परवानगी दिली जात राहील तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही अशी प्रतिज्ञा करतो. काय करावे लागेल बोल? असे सुशील केडिया यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. केडिया यांनी आपले हे ट्विट थेट राज ठाकरे यांनाही टॅग केले आहे. त्यामुळे या प्रकरणी मोठा वाद होण्याची शक्यता आहे.
मनसेकडून धमक्या, केडियांना हवी सुरक्षा
सुशील केडिया आपल्या अन्य एका पोस्टमध्ये म्हणाले, ड्रामा बंद कर राज ठाकरे. तुझ्या 2-4 गुंडांनी माझ्या 10-20 थोपाडीत मारल्या तर मारू देत. पण आम्ही आमच्या पद्धतीने आमरण उपोषणाला बसलो तर तू हात जोडून माफी मागत नाही तोपर्यंत उपोषणावरून उठणार नाही. मग काय उरेल तुझ्याकडे?
राज ठाकरे अमराठी व्यक्तींना धमक्या देत असताना देवेंद्र फडणवीस शांत राहणार का? असा प्रश्नही केडिया यांनी मुख्यत्र्यांना उद्देशून केलेल्या एका पोस्टमध्ये केला आहे.
कोण आहेत सुशील केडिया?
सुशील केडिया हे एक प्रसिद्ध व्यावसायिक व केडियानोमिक्सचे संस्थापक आहेत. ते शेअर बाजारातील तज्ज्ञ म्हणूनही ओळखले जातात. त्यांची गुंतवणूक सल्लागार म्हणूनही ओळख आहे. त्यांची कंपनी गुंतवणूक व बाजारपेठेतील विश्लेषणाचे काम करते. मागील 25 वर्षांपासून ते राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बँकांसोबत काम करत आहेत. मार्केट टेक्निशियन्स असोसिएशनाच्या संचालक मंडळावर वर्णी लागलेले ते आशियातील पहिले व्यक्ती आहेत. सुशील केडिया अनेक बिझनेस चॅनेलवर पाहुणे म्हणून जातात. तिथे ते शेअर बाजार आणि गुंतवणूक विषयावर अधिकारवाणीने बोलतात. मुंबईत राहणाऱ्या केडियांना हिंदी, इंग्रजीशिवाय बंगाली, गुजराती, मराठी भाषा अवगत आहे.
केडीया! या मग्रूरीचे उत्तर जरूर मिळेल -दानवे
दुसरीकडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी केडिया यांना निर्वाणीचा इशारा दिला होता. हा केडीया नाही.. कीड आहे महाराष्ट्राला लागलेली. सरकारला थोडाफार मराठीचा अभिमान उरला असेल तर या सडक्या बुद्धीच्या माणसाने सुरक्षा मागितल्यास ती पुरवू नये. …आणि हो, केडीया! या मग्रूरीचे उत्तर जरूर मिळेल, असे ते म्हणाले.
Sushil Kedia Challenges Raj Thackeray on Marathi Language Stance
महत्वाच्या बातम्या
- संघ + सेवा सहयोग उपक्रमाची 10 वर्षे : निर्मल वारी उपक्रमामुळे वारी मार्गातील गावांमधील अस्वच्छता घटली तब्बल 80 % !!
- ICMR : कोविडनंतर अचानक होणाऱ्या मृत्यूंवर अभ्यास; ICMRचा दावा- लसीशी याचा संबंध नाही
- Delhi : दिल्ली- जुन्या वाहनांसाठी ‘नो-फ्यूल’ आदेश मागे घेण्याची तयारी; मंत्री म्हणाले- प्रदूषण थांबवायला हवे
- Ranvir Shorey : अमराठी दुकानदाराला मारहाण, राक्षस मोकाट फिरत आहेत म्हणत रणवीर शौरीचा मनसेवर संताप