प्रतिनिधी
बीड : Suresh Dhas राज्याचे तत्कालीन कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकार्यकाळात कृषी खात्यात ३०० कोटीरुपयांचा घोटाळा झाला आहे.वाल्मीक कराडने निविदा ठरवल्या,महाराष्ट्रात एजंट नेमले, असा आरोपभाजप आमदार सुरेश धस यांनीकेला. गुरुवारी आष्टीत त्यांनीपत्रपरिषद घेतली. धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याचाअधिकार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे.सिंचन घोटाळ्याच्या आरोपानंतर अजित पवार यांनीस्वतः राजीनामा दिला होता. मग धनंजय मुंडे का देतनाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.Suresh Dhas
आमदार धस म्हणाले, शेतकरी किंवा क्षेत्रीयअधिकाऱ्यांची मागणी नसताना धनंजय मुंडे यांनीखरेदीचा निर्णय घेतला. एकाच दिवशी प्रस्ताव पाठवलाआणि त्याच दिवशी शासन निर्णय (जीआर) निघाला.कृषिमंत्री असताना धनंजय मुंडे निविष्ठा खरेदीत बदलकेला. नॅनो युरिया खरेदीत २१ कोटी २६ लाखांचा घोटाळाकरण्यात आलेला आहे, असे धस यांनी सांगितले.
भारतीय किसान संघाने मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून याघोटाळ्याची चौकशी करण्याचीमागणी केली होती. मात्र, वाल्मीककराड यांनी हे पत्र फाडून टाकल्याचाआरोप आमदार धस यांनी केला.कृषी विभागाला आव्हान देतो, हे पत्रतुमच्याकडे आहे का, असा सवालधस यांनी केला. मुख्यमंत्रीफडणवीस यांनी याचे उत्तर द्यावे,अशी मागणी केली. धनंजय मुंडेयांनी केलेल्या बदल्यांमध्ये १००कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा गंभीरआरोप त्यांनी केला. बदल्यांसाठीचेरेट कार्ड त्यांच्या सहकाऱ्यांकडेसापडले. या बदल्यांमधून मिळणारापैसा थेट धनंजय मुंडे यांच्याकडेजात होता, असा दावा त्यांनी केला.
खटला दाखल करा, धस यांचे मुंडे यांना आव्हान
राज्यात ठराविक एजंटांची नेमणूककरण्यात आली होती. या सर्वांचेकॉल डिटेल्स तपासा. १०० कोटींपेक्षाअधिकचा भ्रष्टाचार यात आहे.वाल्मीक कराड याने निविदाठरवल्या. गैरव्यवहार केवळबीडपुरता नव्हता, तर संपूर्णमहाराष्ट्रभर पसरलेला होता. आताकागदाचा लढा सुरू झाला आहे,खटला दाखल झाला तरी मी माघारघेणार नाही, असे धस म्हणाले.धनंजय मुंडे यांनी अंजलीदमानियांऐवजी माझ्यावर खटलादाखल करावा, असे आव्हान दिले.
मंत्री मुंडे राजीनामा का देत नाहीत, आ. धसांचा सवाल
धनंजय मुंडे यांनी आता अर्ज आणिलगेच कर्ज या पद्धतीने सर्व प्रक्रियाकेली. टेंडर अतिशय नियोजनबद्धपद्धतीने काढले. कुणालाही संशययेऊ नये याची काळजी घेतली. नॅनोयुरियामध्ये २१ कोटी २६ लाख,डीएपीमध्ये ५६ कोटी ७६ लाख,बॅटरी खरेदीत ४५ कोटी ५३ लाखआणि कापूस साठवणुकीची ५७७रुपयांची बॅग १,२५० रुपयांना खरेदीकरण्यात आली. एकूण १८० कोटी ८३लाख रुपये धनंजय मुंडे आणित्यांच्या टीमने बाहेर काढल्याचाआरोप आमदार धस यांनी केला.रफिक नाईकवाडे हे याघोटाळ्यातील सूत्रधार असून, भामरेहे आजही त्यांच्यासोबत आहेत,असा दावा धस यांनी केला.
Suresh Dhas alleges that there was a scam of Rs 300 crore when Dhananjay Munde was the Agriculture Minister, Valmik himself decided the tenders!
महत्वाच्या बातम्या
- अजित पवार गटात येण्यासाठी ब्लॅकमेलिंग,जितेंद्र आव्हाड यांच्या स्वीय सहायकाचा आरोप
- Naxalites : तब्बल १४ लाखांचा इनाम असलेल्या आशासह चार महिला नक्षलींचा खात्मा!
- Shahnawaz Hussain : नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही बिहार निवडणूक लढू आणि जिंकू – शाहनवाज हुसेन
- Rekha Gupta : दिल्लीत नवीन सरकारचे खाते वाटपही जाहीर ; मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्याकडे ५ विभाग