विशेष प्रतिनिधी
मुंबई – एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी वकील सुरेंद्र गडलिंग यांना मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरता सशर्त जामीन मंजूर केला. गडलिंग यांच्या दिवंगत आईच्या विधींबाबत हा जामीन न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने मंजूर केला.Surendra gadling get bail
गडलिंग यांना जून २०१८ मध्ये अटक करण्यात आली होती. या प्रकरणात जामीन मिळणारे ते दुसरे आरोपी आहेत. यापूर्वी कवी वरावरा राव यांना जामीन मिळाला आहे.
गडलिंग यांच्या आईचे मागील वर्षी ऑगस्टमध्ये निधन झाले.
मात्र, त्यांचे काही विधी आणि शोकसभा अद्यापही झालेली नाही. वर्षपूर्तीच्या आधी हे विधी करायला हवेत. त्यामुळे जामीन मंजूर करावा, अशी मागणी त्यांनी अर्जाद्वारे केली होती. न्यायालयाने १३ ते २१ ऑगस्टपर्यंत त्यांना जामीन मंजूर केला आहे.
त्यांचे पारपत्र ‘एनआयए’कडे सुपूर्द करावे आणि सर्व दिवसांचा ‘एनआयए’कडे तपशील द्यावा, असे निर्देश दिले आहेत. तसेच ५० हजार रुपयांचे दोन हमीदार दाखल करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. तसेच स्थानिक पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याचे निर्देश न्यायालयाने दिले.
Surendra gadling get bail
महत्त्वाच्या बातम्या
- रेकॉर्डब्रेक ५५ वर्षे आमदार राहिलेले शेकापचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचे निधन
- बरं झालं मुख्यमंत्री जी तुम्ही एक पाऊल पुढे टाकले…
- सार्वजनिक जीवन जगता असाल तर तुमच्याविषयीच्या बातम्यांमध्ये लोकांना स्वारस्य, न्यायालयाने शिल्पा शेट्टीच्या याचिकेयवरील सुनावणी केली तहकूब
- महिला आयपीएस अधिकाऱ्याला साजुक तुपातली बिर्याणी हवी फुकटात, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिले चौकशीचे आदेश
- बिहारी गुंडा म्हणणाऱ्या महुआ मोईत्रा यांच्यावर तेजस्वी यादव यांनी व्यक्त केला संताप