प्रतिनिधी
मुंबई/पुणे : वेदांत फॉक्सकॉन सेमी कंडक्टर निर्मिती प्रकल्प महाराष्ट्र ऐवजी गुजरातला गेल्याने महाराष्ट्रात जो राजकीय गदारोळ आणि आरोप प्रत्यारोप सुरू आहेत, त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी पुण्यातल्या पत्रकार परिषदेत भाष्य केले आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात व्हायला हवा होता. महाविकास आघाडी सरकारने त्यासाठी प्रयत्न पण केले होते. परंतु, प्रकल्प कुठे उभा राहायचा हा निर्णय घेण्याचा कंपनीला अधिकार आहे. आता प्रकल्प गुजरातला गेला आहे. तो प्रकल्प महाराष्ट्रात परत आणता येणे शक्य नाही, अशा शब्दांमध्ये पवारांनी यासंदर्भातले वास्तव उघड केले. Supriyatai, Ajitdada insist on bringing back Vedanta-Foxconn project
वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेला कोणामुळे?, यावरून महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शरसंधान साधत आहेत. प्रकल्प परत आणण्याचा आग्रह खासदार सुप्रिया सुळे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी धरला आहे. प्रकल्प महाराष्ट्र तळेगाव येथे होणार होता. तो झाला असता तर दीड लाख तरुणांना रोजगार मिळाला असता. पण संबंधित प्रकल्प केवळ सध्याच्या सरकारच्या अनास्थेमुळे गुजरातला गेल्याची टीका अजितदादांनी केली आहे सुप्रिया सुळे यांनी देखील याच मुद्द्यावर त्यांना दुजोरा दिला आहे.
वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पाच्या मुद्द्यावर भाष्य करताना शरद पवार यांनी वास्तव सांगितले आहे. संबंधित प्रकल्प महाराष्ट्रात यावा. तो तळेगावला व्हावा, यासाठी महाविकास आघाडी सरकारने प्रयत्न केले होते. एकनाथ शिंदे आणि उदय सामंत हे त्या मंत्रिमंडळात मंत्री होते. पण त्यांनीच महाविकास आघाडी सरकारवर आरोप करणे हे अजब आहे, असे वक्तव्य शरद पवारांनी केले. त्याचवेळी टीका करा पण ती एक-दोन दिवस ठीक आहे. आता गेलेल्या प्रकल्पावर बोलण्याचा अर्थ नाही. त्यापेक्षा नवीन प्रकल्पासाठी प्रयत्न करा, असा सल्ला पवारांनी सध्याचे सत्ताधारी आणि विरोधक यांना दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे गुजरातचे असल्यामुळे त्यांचे दौरे सर्वाधिक तिथेच होतात. त्यामुळे प्रकल्प देखील तिथे जातात. आता त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही, असा दावाही पवारांनी पत्रकार परिषदेत केला.
वेदांत फॉक्सकॉन प्रकल्पापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला देण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे. त्यावर भाष्य करताना पवारांनी महाराष्ट्राला मोठा प्रकल्प देऊ असे म्हणणे म्हणजे लहान मुलाला फुगा देऊन दुसऱ्या मुलाने हट्ट केल्यावर तुला मोठा फुगा देऊ, असे सांगून समजूत काढण्यासारखे आहे, असा टोला पवारांनी लगावला. यावरचा वाद थांबवून नवीन प्रकल्पासाठी प्रयत्न करण्याचा सल्लाही पवारांनी दोन्ही बाजूंना दिला आहे.
Supriyatai, Ajitdada insist on bringing back Vedanta-Foxconn project
महत्वाच्या बातम्या
- वेदांत फॉक्सकॉन प्रकल्प : सुभाष देसाई आधी काय म्हणाले?, आज काय म्हणाले?; नितेश राणेंनी केले ट्विट!!
- ईडीची धडक कारवाई : मुंबईतल्या झवेरी बाजारातून तब्बल 92 किलो सोन्यासह 330 किलो चांदी जप्त!
- मुंबईसह सर्व महापालिकांमध्ये मनसे, तर ग्रामीण भागात शेट्टींची स्वाभिमानी स्वतंत्र लढणार!!
- सांगलीत 4 साधूंना मारहाण : फडणवीसांचा रशियातून पोलीस महासंचालकांना फोन; मागविला रिपोर्ट!!