• Download App
    सुप्रिया सुळे भाजपशी "वैचारिक" लढणार, पण भाजपने मुख्यमंत्री केले तर अजितदादांना हार घालणार!! supriya Sule will fight BJP Ideologically

    सुप्रिया सुळे भाजपशी “वैचारिक” लढणार, पण भाजपने मुख्यमंत्री केले तर अजितदादांना हार घालणार!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : शरदनिष्ठ राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाचे आज “भविष्य” वर्तविले. सुप्रिया सुळे स्वतः भाजपशी “वैचारिक” लढाई लढणार आहेत, पण भाजपने मुख्यमंत्री केलेल्या अजितदादांना मात्र त्या पहिला हार घालायला जाणार आहेत. Supriya Sule will fight BJP Ideologically

    शरदनिष्ठ राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये आयोजित केलेल्या महिलांच्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांनी भाजपशी “वैचारिक” लढाई पुकारली, पण अजित पवारांशी थेट लढाई टाळली.


    अकेला देवेंद्र क्या करेगा??, विचारणाऱ्या सुप्रिया सुळेंना आता भाजपने फडणवीसांवर “अन्याया” केल्याचे “दुःख”!!


    आपली कोणाशीच वैयक्तिक लढाई नाही, पण वैचारिक लढाई आहे, आजपर्यंत भाजपचेच नेते अजित पवारांवर 70000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप करत होते आणि त्यांनीच अजितदादांना सरकारमध्ये घेऊन उपमुख्यमंत्री केले. त्यामुळे आता भारतीय जनता पार्टीला भ्रष्ट जुमला पार्टी असे नाव द्यावे लागेल, असे शरसंधान सुप्रिया सुळे यांनी साधले.

    भाजपवाले आपल्यामध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढाई लावून मजा बघत आहेत, पण आपण त्यांच्या जाळ्यात सापडणार नाही. आपण शिवसेना किंवा राष्ट्रवादी अशी लढाईच करणार नाही. आपला वैचारिक लढा भाजपशी आहे. कोणाशीही वैयक्तिक लढाई नाही, असे वक्तव्य करून सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांशी थेट पंगा घेणे टाळले.

    मात्र, त्याचवेळी भाजपला चिमटा काढताना भाजपकडे टॅलेंट नसल्यामुळे ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीतून नेते फोडून नेतात आणि त्यांना मंत्री करतात. भाजपचे कार्यकर्ते सतरंज आणि खुर्च्या उचलण्यासाठी असतात आणि प्रत्यक्ष पण चांदीच्या ताटांच्या पंगतीला बसवण्यासाठी भाजपला काँग्रेसी संस्कारांचेच नेते लागतात. हेडगेवारांचे नाव घेऊन मते मिळत नाहीत, तिथे यशवंतराव चव्हाणांचेच फोटो लावावे लागतात, असा टोला सुप्रिया सुळे यांनी भाजपला लगावला.

    पण या सगळ्या प्रकारात सुप्रिया सुळे आजही अजित पवारांशी मात्र थेट लढायचे टाळतात, हेच दिसून आले.

    supriya Sule will fight BJP Ideologically

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!