• Download App
    Supriya Sule अमित शाहांना मराठी माणूस मोठा झालेला खपत नाही; शिवसेनेच्या पावलावर पाऊल ठेवत सुप्रिया सुळेंचा निशाणा

    Supriya Sule : अमित शाहांना मराठी माणूस मोठा झालेला खपत नाही; शिवसेनेच्या पावलावर पाऊल ठेवत सुप्रिया सुळेंचा निशाणा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Supriya Sule केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि महाराष्ट्रातल्या भाजपच्या नेत्यांना मराठी माणूस मोठा झालेला खपत नाही. म्हणून ते महाराष्ट्रात येऊन ठाकरे आणि पवारांच्या पराभवाची भाषा करतात, अशा शब्दांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निशाणा साधला. Supriya Sule Target of  Amit shah

    अमित शहा यांच्या दोन दिवसांच्या झंझावाती दौऱ्यानंतर महायुतीचे महाविकास आघाडी पुढे आव्हान मोठे झाले आहे या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी अमित शाह यांच्या दौऱ्याची वेगळ्या प्रकारे खिल्ली उडवायचा प्रयत्न केला.Supriya Sule

    सुप्रिया सुळे म्हणाल्या :

    किरीट सोमय्या अनेक वर्षांपासून एक मोठे फायटर आहेत. डर्टी डझन नावाची सीरिज त्यांनीच काढली. मी कधीच विसरले नाही. डर्टी डझन कुठे आहेत, हा एक मोठाच प्रश्न आहे. काल मी त्या डर्टी डझनपैकी एका माणसाचा फोटो अमित शहांसोबत बघितला. ती फाईल क्लिअर आहे का, मग भाजपाने आणि अमित शहांनी टीव्हीवर येऊन सांगितले पाहिजे की, हो, मी जो हसन मुश्रीफांवर आरोप केला; तो खोटा होता. एवढे तरी अमित शहा यांनी खरे बोलावे.Supriya Sule

    अक्षय शिंदे याला भर चौकात फाशी द्यायला हवी होती. तर देशभरात शिवरायांच्या काळातील न्याय महाराष्ट्रात अजूनही दिला जातो हा मेसेज गेला असता. आणि वाईट कृत्य करणाऱ्यांना धडकी भरावी अशी शिक्षा द्यायला हवी होती. सरकारने जे काम करावे ते संविधानाच्या चौकटीत राहुन करावा. माझ्या देवेंद्र फडणवीसांकडून खूप अपेक्षा आहेत, त्यांनी असे वागणे योग्य नाही. त्या घटनेत सर्व जण शिंदे आहेत, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी फडणवीसांची नाही का? असा सवाल सुळेंनी उपस्थित केला आहे.


    Narendra Modi : ‘हरियाणाचे हे प्रेम माझ्या आयुष्यातील मोठा ठेवा आहे’


    गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंदूक घेऊन फोटोवर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, ही काही सिरीज नाही, हा महाराष्ट्र आहे. हा देश बंदुकीवर नाही तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो, हे लक्षात घेणं गरजेचे आहे. देवेंद्र फडणवीस जितक्या वेळी बंदूक आमच्यावर रोखतील तितक्या वेळी आम्ही त्यांना संविधान दाखवू. यासाठी त्यांच्या गोळ्या खायची वेळ आली तरी आम्ही ते करु. फडणवीसांचे वागणे हे छत्रपती शिवराय आणि शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला न शोभणारे आहे.Supriya Sule

    ज्यांना एका वर्षापूर्वी हे डर्टी डझन म्हणत होते, तेच डर्टी डझन अतिशय विनम्रपणे अमित शहांना भेटले. मला कौतुक दोघांचंही वाटतं. अमित शहांचंही वाटतं, कारण त्यांचा पक्ष हसन मुश्रीफ डर्टी डझनपैकी एक म्हणत होता. मला गंमत त्या माणसाचीही वाटते, ज्याच्या बायकोला लढावे लागले. त्यांच्या नातवडांना दूध मिळत नव्हतं. त्यांची बायको लढत होती. ज्यांनी ईडी तुमच्या घरी पाठवली. ते हसन मुश्रीफ अमित शहा अभिवादन करत होते.

    मराठी माणसाला हरवायला लढताय

    अमित शहांनी स्वत: कबुल केले की ते स्वत:हून जिंकू शकत नाही. त्यांचे एकच लक्ष्य आहे की उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना हरवायचे. त्यांनी काहीच केले नाही हाच याचा अर्थ आहे, आम्ही महाराष्ट्रातील जनतेसाठी लढतो आहोत आणि भाजपचे नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना हरवण्यासाठी लढत आहेत.मराठी माणूस मोठा होतोय हे त्यांना पाहावले जात नाहीये, म्हणून त्यांच्या पराभवासाठी हे लोकं लढत आहे. 5 वर्षांपूर्वी देखील अशीच शरद पवारांना ईडीची नोटीस पाठवली होती.

    मराठी माणसांच्या विरोधातील हे सरकार आहे, त्यांना मराठी माणसांने मोठे झालेले चालत नाही. त्यांना हरवणे शक्य नसेल तर पक्ष फोडा हे एकच गोष्ट यांच्याकडे राहिली आहे. त्यामुळे अमित शहांच्या वक्तव्याबद्दल काही वाटले नाही. ते पक्ष आणि चिन्ह घेऊन जातील पण मराठी माणसांचा स्वाभिमान कधीही घेऊन जाऊ शकणार नाही.

    Supriya Sule Target of  Amit shah

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस