विशेष प्रतिनिधी
मुंबई : तुतारीला पुन्हा पिपाणीचा धसका; तब्बल 4500 उमेदवारांपैकी फक्त 160 उमेदवारांना पिपाणी चिन्ह दिले म्हणून निवडणूक आयोगावर राग काढला!! शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी हे केले.
लोकसभा निवडणूक मध्ये पिपाणी चिन्हामुळे तुतारी चिन्हावरचे दोन उमेदवार हरले, असा दावा पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला होता. त्यांनी निवडणूक आयोगाकडे पिपाणी चिन्ह कायमचे गोठविण्याची मागणी देखील केली होती. परंतु निवडणूक आयोगाने पिपाणी चिन्ह संपूर्णपणे गोठविणे शक्य नाही. कारण अपक्ष उमेदवारांची संख्या खूप वाढल्याने चिन्हांची संख्या देखील कमी करता येणे शक्य नाही, असे स्पष्ट केले होते. परंतु पिपाणी चिन्हाच्या समोर ट्रंपेट असे स्पष्ट लिहिण्यात येईल, असे आश्वासन निवडणूक आयोगाने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला दिले होते. त्यानुसार महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाने तब्बल साडेचार हजार उमेदवारांपैकी फक्त 160 उमेदवारांना पिपाणी अर्थात ट्रंपेट हे चिन्ह दिले.
आता या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगावर आणि भाजपवर राग काढला. महाराष्ट्र विधानसभेच्या 288 मतदारसंघांपैकी 160 मतदारसंघांमध्ये पिपाणी चिन्ह देऊन भाजपने रेडीचा डाव खेळल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. परंतु यात महाराष्ट्रातल्या तब्बल 4500 पेक्षा जास्त उमेदवारांपैकी फक्त 160 उमेदवारांना पिपाणी चिन्ह दिल्याचे सत्य सुप्रिया सुळे यांनी लपविले.
Supriya sule target election commission of india
महत्वाच्या बातम्या
- Devendra Fadnavis attack देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल; मतांसाठी मविआचे नेते उलेमाचे तळवे चाटत आहेत
- Ramgiri Maharaj रामगिरी महाराज : ट्रम्पच्या निवडणुकीत हिंदूंची एकजूट उपयोगी ठरू शकते, तर भारतात का नाही उपयोगी ठरणार??
- Virat Kohli : विराट कोहली जखमी! बॉर्डर-गावसकर ट्रॉफीपूर्वी बरा झाला नाहीतर…
- Piyush Goyal : पियुष गोयल यांचा वाहन कंपन्यांना सल्ला ; ‘विक्री वाढवण्यासाठी…’