नाशिक : महिला IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना केलेल्या दमबाजीचा मुद्दा अजितदादांनी बासनात गुंडाळला; पण त्यांच्या बहिणीने आणि पुतण्याने तो पुन्हा तापविला!!, असे अंजना कृष्णा यांच्यावर झालेल्या दमबाजीच्या मुद्द्यावर पुन्हा घडले.
करमाळा तालुक्यातल्या कर्डू गावात होत असलेले बेकायदा मुरूम उत्खनन थांबवण्यासाठी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा गेल्या, पण अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पुढार्याने थेट अजितदादांना फोन लावून त्यामध्ये हस्तक्षेप करायची मागणी केली. अजित पवारांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना फोनवरून दमबाजी केली. त्यांचा व्हिडिओ आणि ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर ते सगळे प्रकरण अजितदादांच्या अंगाशी आले. सुरुवातीला रोहित पवारांनी त्यांची पाठराखण केली. अजितदादांचे आमदार अमोल मिटकरी सुद्धा आक्रमकपणे अजितदादांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांनी अंजना कृष्णा यांच्यावर दुगाण्या झोडल्या. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार चाव्या फिरवल्या. त्यामुळे नेहमीच दादागिरी करणाऱ्या अजितदादांना दिलगिरी व्यक्त करून माघार घेणे भाग पडले. त्यांच्यापाठोपाठ अमोल मिटकरी यांना देखील दिलगिरी व्यक्त करावी लागली. एकूणच ते प्रकरण अजितदादांच्या अंगाशी चांगलेच शेकले. मराठी माध्यमांनी सुद्धा अजितदादांची दादागिरी उतरवून ठेवली.
– रोहित पवारांनी घेतली अजितदादांची कड, पण…
या पार्श्वभूमीवर रोहित पवार पुन्हा एकदा अजितदादांच्या पाठीशी उभे राहिले. अजितदादांच्या पक्षातले दुसऱ्या फळीतले नेते आणि मित्र पक्षाच्या दुसऱ्या फळीतले नेते अजितदादांवर मीडिया ट्रायल करतात अशी भली मोठी पोस्ट रोहित पवारांनी सोशल मीडिया हँडलवर लिहिली. त्यांनी अजितदादांची कड घेतल्याचे दाखविले. प्रत्यक्षात अजितदादांना त्यातून टोले देखील हाणून घेतले. अजितदादांनी जो मुद्दा दिलगिरी व्यक्त करून बासनात गुंडाळून टाकला होता, तोच मुद्दा रोहित पवारांनी अजितदादांची कड घेतोय असे दाखवत पुन्हा तापविला. त्यामुळे अजितदादांच्या दमबाजीचा पुन्हा इतिहास उगाळला गेला. माध्यमांनी त्यांच्या बातम्या केल्या.
– सुप्रिया सुळे यांनीही ठोकले
रोहित पवार यांच्या पाठोपाठ सुप्रिया सुळे यांनी देखील अजितदादांनी केलेल्या दमबाजीचा मुद्दा पुन्हा तापविला. त्या अंजन कृष्णा यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. महिला अधिकाऱ्यांना कुणी दमबाजी करत असेल, तर ते सहन केले जाणार नाही. एकीकडे बेटी बचाव बेटी पढाओ म्हणायचं आणि दुसरीकडे महिला अधिकाऱ्याला गलिच्छ वागणूक द्यायची हे आपल्याला शोभणारे नाही, अशा शब्दांमध्ये सुप्रिया सुळे यांनी अजितदादा आणि अमोल मिटकरी यांचे कान उपटले. बाकीचे लोक कॉपी करून पास झाले. पण ही महिला मेरीट मध्ये 335 रँक मिळवून सोलापूर जिल्ह्यात काम करते, याचा मला सार्थ अभिमान वाटतो, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
अंजना कृष्णा यांच्यावर अजितदादांनी केलेल्या दमबाजीचा मुद्दा या निमित्ताने पुन्हा तापला. जो मुद्दा अजितदादांना बिलकुलच पुन्हा समोर यायला नको होता, तो त्यांच्या बहिणीने आणि पुतण्यानेच समोर आणून तापविला.
– फडणवीसांची कणखर भूमिका
या सगळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कणखर भूमिका महत्त्वाची ठरली. त्यांनी वरवर अजितदादांची बाजू घेतली, पण करमाळा तालुक्यातल्या घटनेचा संपूर्ण अहवाल त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागितला. त्यामुळे अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पुढार्यांचे अवैध धंदे उघड्यावर आले. त्या पुढार्यांना अजितदादांचे आशीर्वाद असल्याचेही उघड झाले. एरवी आत्तापर्यंतच्या वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांवर कुरघोड्या करणाऱ्या अजितदादांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुरघोडी केली. अजितदादांना दिलगिरी व्यक्त करावीच लागेल, अशी वातावरण निर्मिती केली. यामध्ये त्यांनी मुख्यमंत्र्यांचे अधिकार व्यवस्थित वापरले. अजितदादांसारख्या वर्चस्ववादी उपमुख्यमंत्र्याला आपल्या डोक्यावर बसू दिले नाही. राज्याचे प्रमुख आपण आहोत, अजितदादा नाहीत, त्यांची दादागिरी चालणार नाही, हे फडणवीसांनी अतिशय सूचकपणे स्पष्ट केले.
या पार्श्वभूमीवर अजित पवारांना अंजना कृष्णा हे प्रकरण पुन्हा तापायला नको होते, पण त्यांच्याच बहिणीने आणि पुतण्याने ते पुन्हा तापविले.
Supriya Sule supports Anjana Krishna, scolds Ajit Pawar
महत्वाच्या बातम्या
- PM Modi पंजाबला पंतप्रधान मोदींकडून १,६०० कोटींचं मदत पॅकेज
- BRICS : ब्रिक्स शिखर परिषदेत चीनची हाक : “टॅरिफ युद्धाला तोंड देण्यासाठी एकजूट आवश्यक”
- सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपतीपदी; मोदी सरकार पाडण्यासाठी राहुल बाबा उंगल्या करायला गेले; पण INDI आघाडीच्या खासदारांचीच एकजूट नाही टिकवू शकले!!
- मातोश्री भेटीनंतर काँग्रेसचे नेते गेले फडणवीसांकडे; विधान परिषदेतल्या विरोधी पक्षनेते पदासाठी घातले साकडे; महाराष्ट्राचे राजकारण 360° मध्ये फिरल्याचे चिन्ह दिसले!!