• Download App
    Supriya Sule एकीकडे सुप्रिया सुळेंचे victim card, दुसरीकडे teaser मधून अजितदादांवर वार; तरीही सत्तेच्या वळचणीला जायला पवारांची राष्ट्रवादी तयार!!

    एकीकडे सुप्रिया सुळेंचे victim card, दुसरीकडे teaser मधून अजितदादांवर वार; तरीही सत्तेच्या वळचणीला जायला पवारांची राष्ट्रवादी तयार!!

    एकीकडे सुप्रिया सुळे यांचे victim card, दुसरीकडे टीचर मधून अजितदादांवर वार आणि तरीही सत्तेच्या वळसणीला जायला पवारांची राष्ट्रवादी तयार!! असला प्रकार राष्ट्रवादीच्या 26 व्या वर्धापन दिनी समोर आला.

    राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या आदल्या दिवशी खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हाट्सअप स्टेटस ठेवले. त्यामध्ये त्यांनी सहन करायला शिका, पण संस्कार विसरू नका अशी डिंग वाजवली. एकीकडे राष्ट्रवादीतल्या नेत्यांचे सुनांना छळून मारण्याचे “संस्कार” सगळ्या महाराष्ट्र समोर उघड्यावर येत असताना सुप्रिया सुळे यांनी संस्कारांची डिंग वाजवली, पण त्याचवेळी सुप्रिया सुळेंनी आपल्यावर फार मोठा अन्याय झाल्याचे victim card खेळले. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जबरदस्त धोबीपछाड घेऊन जणू काही महाराष्ट्राने फार मोठा अन्याय केलाय, असा आव सुप्रिया सुळे यांनी स्टेटस द्वारे आणला. पण त्या स्टेटसचा आज खुलासा करताना त्यांनी आपल्या आईने सल्ला दिला होता. त्याप्रमाणे स्टेटस ठेवले तो माझा वैयक्तिक विषय आहे, असा खुलासा केला. पण हा खुलासा करायला त्यांना 12 तास लागले. दरम्यानच्या काळात स्टेटसची चर्चा घडवून सुप्रिया सुळे यांनी victim card खेळवून घेतले होते.

    एकीकडे सुप्रिया सुळेंनी असे victim card खेळले असतानाच दुसरीकडे जन्मदात्या सोबतच राष्ट्रवादीत श्वास घेऊ, असे teaser चालवून शरद पवारांच्या राष्ट्रवादीने अजित पवारांना डिवचले. शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला जन्म दिला. ती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांनी पळवली, पण म्हणून सगळे कार्यकर्ते त्यांच्याबरोबर गेले नाहीत. ते जन्मदात्या शरद पवारांबरोबरच राहिले, असे पवारांच्या राष्ट्रवादीने teaser मधून अजित पवारांना सुनावले.

    – कार्यकर्त्यांना झुलवत ठेवणे हा तर पुढचा अजेंडा

    पण म्हणून अजित पवारांच्या सत्तेच्या वळचणीला जाणार नाही. त्यांच्या सत्तेच्या तुकड्यातला वाटा खेचून घेणार नाही असा कुठलाही निर्धार शरद पवारांच्या राष्ट्रवादीने केला नाही. उलट अजित पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर जायचे असेल तर कार्यकर्त्यांच्या भावना सर आंखो पर असे म्हणत सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी बरोबर जाण्याची तयारी दाखवली. पण त्याचवेळी अजितदादांबरोबर जाण्यासाठी कुठलीही कालमर्यादा नाही, असे सांगून कार्यकर्त्यांना झुलवतही ठेवले. कालमर्यादेचा मुद्दा आणून सुप्रिया सुळेंनी अजितदादांच्या आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या पोटात गोळा आणला. महापालिका आणि जिल्हा परिषदा निवडणुका तोंडावर आल्या असताना राष्ट्रवादीचे ऐक्य झाले तर आपल्याला फायदा आहे, अन्यथा आपण बाराच्या भावात जाऊ अशी भीती शरद पवारांच्या आणि काही प्रमाणात अजित पवारांच्या इच्छुक कार्यकर्त्यांना वाटते म्हणून तर त्यांना ऐक्याची गरज आहे. ते ऐक्य वेळेत झाले, तर त्याचा फायदा आहे. अन्यथा भविष्यात कधीतरी ऐक्य होणार असेल तर त्याचे लोणचे घालायचे काय?? असाच कार्यकर्त्यांचा सवाल आहे.

    Supriya Sule played victim card on NCP SP anniversary

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Fadnavis Announces : सर्व लोकल एसी होणार– भाडेवाढ नाही! देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

    Zeeshan Akhtar : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील फरार मुख्य आरोपी झीशान अख्तर कॅनडामध्ये ताब्यात

    Toll Policy : आता एक्सप्रेस वेवर जेवढी चालेल गाडी, तेवढाच आकारला जाणार टोल?