• Download App
    मोदींनी शिर्डीत येऊन पवारांवर टीका केली म्हणून सुप्रिया सुळे यांना "आनंद"!! Supriya sule "overwhelmed" by criticism of sharad pawar by PM Modi, as at least he "mentioned" pawar!!

    मोदींनी शिर्डीत येऊन पवारांवर टीका केली म्हणून सुप्रिया सुळे यांना “आनंद”!!

    प्रतिनिधी

    मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिर्डीतल्या कार्यक्रमात शरद पवारांचे नाव न घेता त्यांच्या कृषिमंत्री पदाच्या कारकिर्दीवर टीका केली याचा “आनंद” शरदनिष्ठ राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. Supriya sule “overwhelmed” by criticism of sharad pawar by PM Modi, as at least he “mentioned” pawar!!

    पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच पवार साहेबांचे नाव घेतात. कधी कौतुकाने घेतात,तर कधी टीका करतात. त्यामुळे महाराष्ट्रात आल्यावर त्यांना पवारांचे नाव घ्यावे लागते. इतना तो हक बनता है, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी “आनंद” व्यक्त केला.

    शरद पवार 10 वर्षे कृषिमंत्री राहिले, पण शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत देऊन धान्य खरेदी करू शकले नाहीत. 10 वर्षांच्या कारकीर्दीत केवळ साडेतीन लाख कोटी रुपयांची धान्य त्यांनी शेतकऱ्यांकडून खरेदी केले, पण केंद्रात आमच्या सरकारने तब्बल साडे तेरा लाख कोटी रुपयांचे धान्य शेतकऱ्यांकडून किमान आधारभूत किंमत वाढवून खरेदी केले, असा टोला मोदींनी काल शिर्डीत हाणला होता.

    मात्र, मोदींनी पवारांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली, याचाच सुप्रिया सुळे यांना “आनंद” झाला. मोदींनी पवारांना पद्मविभूषण किताब दिला, तो त्यांच्या शेतीविषयक कामाकडे पाहूनच दिला होता. मोदी कधी पवार साहेबांची स्तुती करतात, तर कधी त्यांच्यावर टीका करतात, राजकारणात असे चालतेच. इतना तो हक बनता है. पण मला एका गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रात आल्यावर मोदी पवारांचे नाव घेतात, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. मोदी नेहमी राष्ट्रवादी काँग्रेसला नॅचरली करप्ट पार्टी म्हणतात, पण यावेळी त्यांनी टीका केली नाही, याचाही “आनंद” सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला.

    Supriya sule “overwhelmed” by criticism of sharad pawar by PM Modi, as at least he “mentioned” pawar!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी मुंबईत तणाव, फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल!

    Mumbai Kohima : भारतात मुंबई आणि कोहिमा महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरे; पाटणा आणि दिल्ली सर्वात कमी सुरक्षित

    Devendra Fadnavis मराठा आंदोलनावर राजकीय पोळी भाजणाऱ्यांचे तोंड भाजेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा इशारा!!