विशेष प्रतिनिधी
पुणे : काँग्रेसच्या EVMs विरोधातील आंदोलनावर सुप्रिया सुळेंनी खोडा घातला. युगेंद्र पवार यांना देखील बारामतीतला फेरमतमोजणीचा अर्ज मागे घ्यायला सांगितला. कोणत्याही पुराव्यांशिवाय EVMs वर आक्षेप घेण्यात मतलब नाही, असे त्या म्हणाल्या.
मी स्वतःच याच EVMs मधल्या मतदानाच्या लोकसभेत पोहोचले आहे. EVMs टॅम्पर होतात, यासंबंधी कोणतेही ठोस पुरावे नाहीत. तसे कुणी देत देखील नाही. त्यामुळे EVMs विरोधात उगाच बोलणं बरोबर नाही, असे सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांना सांगितले.
युगेंद्र पवारांना देखील बारामतीतला फेरमतमोजणीचा अर्ज मागे घ्यायला सांगितले आहे. युगेंद्र राजकारणात नवा आहे. पण त्याने गेल्या काही महिन्यांत मोठा संघर्ष केला. त्याचा निवडणुकीचा पहिलाच अनुभव होता. आता बाकीच्यांनी पण फेरमतमोजणी अर्ज मागे घेतले आहेत, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
या सगळ्या वक्तव्य आणि कृतीतून सुप्रिया सुळे यांनी एका झटक्यात काँग्रेसच्या EVMs विरोधातल्या आंदोलनात खोडा घातला. त्या ममता बॅनर्जी, उमर अब्दुल्ला यांच्या लाईनीत जाऊन बसल्या.
Supriya sule opposed Congress agitation against EVMs
महत्वाच्या बातम्या
- Governor : माजी केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला मणिपूरचे, तर जनरल व्ही. के. सिंह मिझोरामचे राज्यपाल!!
- छगन भुजबळ ते अभयसिंहराजे भोसले; राष्ट्रवादीतल्या खच्चीकरणाचे किस्से, त्यांच्याच नेत्यांनी चव्हाट्यावर आणले!!
- Lawrence Bishnoi : लॉरेन्स बिश्नोईने आता अमेरिकेत निर्माण केली दहशत!
- Delhi elections : दिल्ली निवडणुकीपूर्वी बांगलादेशी घुसखोरांचे दणादण बनवले जात होते मतदार कार्ड